युवासेनेचा पोस्टरमधून सवाल, क्या यही है अच्छे दिन?
मुंबई: देश भरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केली जात आहे. मुंबईत सुद्धा युवासेनेने पोस्टरबाजी करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. सततच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचा संताप वाढला आहे. वाढत्या पेट्रोल दरा विरोधात युवासेनेकेडून भाजप आमदार आणि आशिष शेलार यांचा मतदार संघाने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. युवासेनेकडून वांद्रे पश्चिम मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे. खार, वांद्रे पश्चिम आणि सांताक्रुझमधल्या सर्व पेट्रोल पंपावर हे पोस्टर लावले आहेत. या पोस्टर मध्ये यही हे अच्छे दिन ? असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, गेल्या १० महिन्यात पेट्रोल च्या दरात २० रुपये तर डिझेल २१ रुपयांनी महागल आहे. याआधीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे मोदी सरकारवर महागाई विरोधात आंदोलन करण्यात आली आहे. त्यात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल पंपावरच पोस्टर झळकावले आहेत.