|

होय! रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर भाजपला मदत कर म्हणून दबाव आणला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोल्हापूर: फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून रश्मी शुक्ला यांनी शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्यावर महाविकास आघाडीत सामील होऊ नये यासाठी दबाव आणला होता असा आरोप केला आहे.

यावर खासगी वाहिनीशी बोलतांना शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी प्रतिक्रिया दिली, रश्मी शुक्ला यांनी भाजपला मदत करावी यासाठी प्रयत्न केला होता. त्यांचा फोन आला होता. मात्र, जनतेचा कानोसा घेऊन मी निर्णय घेईल असे त्यांना सांगितले होते.

अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यासाठी शिरोळे तालुक्यात महामेळावा घेण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या एकमताने, त्यांच्या भूमिका नुसार निर्णय घेतला आल्याचे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी सांगितले. यामुळे आव्हाड यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे बोलण्यात येत आहे.

काय म्हणाले होते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड?

“शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत” असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *