Friday, October 7, 2022
HomeUncategorizedचिंताजनक! कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत देशातील १० जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील नऊ

चिंताजनक! कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत देशातील १० जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील नऊ

‘हे’ आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या असलेले जिल्हे

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.

“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं. याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत.

याशिवाय गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.

लसीकरणाचा फीडबॅक चांगला

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार डॉ. हर्ष वर्धन यांनी राष्ट्रीय स्तरावर लसीकरणासंदर्भातील फीडबॅकबद्दल सांगितले की, “लसीकरणाचा फीडबॅक खूप चांगला आहे. आज सकाळपर्यंत ४.५ कोटी डोस दिले गेले आहेत. ७६ देशांना ६ कोटी डोस देखील दिले आहेत. त्यामुळे केवळ आपला भारतच नाही तर आपण संपूर्ण जगाला मदत करत आहोत. लस देण्याचे कामही जन आंदोलना सारखंच केले जात आहे. आता लसीबाबतची भीतीही कमी झाली आहे. आम्ही लोकांना लसीबाबत माहिती देण्यासाठी देखील एक मोहीम राबवत आहोत, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं

भारतील १० शहरे कोरोना हॉटस्पॉट, त्यातील ९ शहरे महाराष्ट्रातील  

 • पुणे : ४३ हजार ५९०
 • नागपूर : ३३ हजार १६०
 • मुंबई : २६ हजार ५९९
 • ठाणे : २२ हजार ५१५
 • नाशिक : १५ हजार ७१०
 • औरंगाबाद : १५ हजार ३८०
 • बंगळूरू : १० हजार ७६६
 • (ग्रामीण )
 • नांदेड :  १० हजार ६०१
 • जळगाव : ६ हजार ८७
 • अकोला : ५ हजार ७०४

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments