चिंताजनक! राज्यात एका दिवसात आढळून आले तब्बल ४३ हजार कोरोनाचे रुग्ण

मुंबई: राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले आहे तर पुणे सारख्या शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहे. तरीही कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी २४ तासात ४३ हजार १८३ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहे. वाढती कोरोना बाधितांची संख्या सरकारच्या चितेत वाढ करणारी आहे. यामुळे लॉकडाउन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर गुरुवारी उपचारा नंतर ३२ हजार ६४१ जाणंना घरी सोडण्यात आले आहे. तर राज्यभरात एका दिवशी कोरोनामुळे २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूचा दर १.९२ टक्के आहे तर. रुग्ण बरे होण्याचा दर ८५.२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १९ हजार ९४८ व्यक्ती घरीच विलागिकरणात आहेत. तर १८ हजार ४३२ जन विलागिकरण केंद्रात उपचार घेत आहे.
तर पुणे जिल्ह्यात ८ हजार ११ कोरोना बाधित आढळून आले तर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ८ हजार ६४६ रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32641 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2433368 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 366533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2021