|

बिनकामी ‘नोटा’ ठरणार कामाचं?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: निवडणुका बरोबर ‘नोटा’ची चर्चा होत असते. उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपापल्या मतदारसंघाच्या हिताचा विचार करू शकणारा नसेल, तर त्यासाठी आपल्याला ‘नोटा’ चा पर्याय देण्यात येतो. नोटा चा पर्याय निवडणं म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात असलेले सगळे उमेदवार अमान्य असल्याचं सांगणे.     

उमदेवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाकडे भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास त्या मतदारसंघातील निवडणुका रद्द कराव्यात. त्यानंतर या मतदारसंघात नव्याने निवडणुका घ्याव्यात आणि रद्द झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना नव्याने होत असलेल्या निवडणुकीत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच सहा महिन्याच्या आत या निवडणुका घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी या मागणीवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. ही मागणी मान्य केल्यास अशा परिस्थितीत त्या जागेवर कुणाचंच प्रतिनिधीत्व राहणार नाही. मग सभागृहाचं काम कसं चालणार?, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *