पक्षाविरोधात काम करणे भाजप नगरसेवकांना पडणार महागात
कारवाई करण्याचे पक्षाचे संकेत
सांगली: सांगली महापालिकेत पक्षाविरोधात काम करणे भाजपच्या नगरसेवकांना महागात पडणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या ७ नगरसेवकांनी व्हीप डावलून कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली होती. भाजप कडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.
महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.
सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिकेतील गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून कारवाईचे संकेत दिले आहे. दोन दिवसांपपूर्वी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या ५ नगरसेवकांनी व्हीप डावलून कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मतदान केले होते. तर, दोन नगरसेवक गैरहजर राहिले होते. या निवडणुकीचे पडसाद राज्यभर पसरले आहे. व्हीप डावलणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाडा महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – ४१
अपक्ष – ०२
राष्ट्रवादी – १५
कॉंग्रेस – २०