Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाअभिमन्यू काळेच्या बदलीवरून शिवसेना नेत्याचा सरकारला घरचा आहेर

अभिमन्यू काळेच्या बदलीवरून शिवसेना नेत्याचा सरकारला घरचा आहेर

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून राजकारण तापले आहे. या इंजेक्शनच्या कमतरतेवरून अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची काही दिवसापूर्वी बदली करण्यात आली आहे. माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यावरून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला असून अभिमन्यू काळे यांची बदली चुकीची व निषेधार्थ आहे असे मत व्यक्त केले आहे.
याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वुई सपोर्ट अभिमन्यू काळे असे ट्वीट केले आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील,
बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ
“राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे. अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे.
प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकारी
मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे” असे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments