Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाएकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री अजित...

एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : काँग्रेसचे मुंबईचे माजी शहराध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं आज कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्त्व हरपले असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहताना आपली भावना व्यक्त केली आहे.

गायकवाड यांना श्रद्धांजली वाहताना अजित पवार म्हणाले की, ‘माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेलं, सर्वमान्य नेतृत्व होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचं निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. ‘

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले होते. उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments