भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का ?

राहुल गांधी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेस नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किमीची पदयात्रा करणार आहेत. यादरम्यान, 12 राज्यात आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहुल गांधी हे महिला कार्यकर्ते, दलित संघटना, पर्यावरणवादी, पत्रकार आणि इतर लोकांशी संवाद साधणार आहेत.

ही पदयात्रा एकूण 150 दिवस चालणार आहे. 7 सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून आज यात्रेचा 22 वा दिवस आहे. या 22 दिवसांमध्ये राहुल गांधींनी 400 किमीपेक्षा अंतर कापले आहे. तामिळनाडूमधून सुरु झालेली यात्रा सध्या केरळात असून काश्मीरला पोहोचायला 128 दिवस लागणार आहेत.

आजवरच्या पदयात्रेत राहुल गांधींनी विविध कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राहुल गांधी हे भाजप सरकार टीकास्त्र डागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर बोट ठेवून सरकारविरोधी भूमिका मांडत आहेत.

स्कूल बस मध्ये प्रवास करत विद्यार्थ्यांशी देखील राहुल गांधीनी सवांद साधला आहे. विविध धार्मिक स्थळे, मठ, शाळा आणि आश्रमांना, भेटी देत राहुल गांधी जनसामान्यांमध्ये मिसळत आहेत. उर्वरित भागातील भारत जोडो यात्रेदरम्यान विविध सण, उत्सव येणार आहेत. त्यामध्ये देखील राहुल गांधी सहभाग घेतील.

विशेष म्हणजे, विजयादशमी थोड्याच दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राहुल गांधी दसरा साजरा करतील का? दसऱ्यादिवशी रावणाचे दहन करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे केरळमधून ही यात्रा कर्नाटकात प्रवेश करेल. कर्नाटकमध्ये 21 दिवसात एकूण 511 किलोमीटरचा प्रवास करेल. कर्नाटकमधील 21 दिवसांमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा करण्याचे नियोजन केले गेलेले आहे. या वेळापत्रकानुसार राहुल गांधींची यंदाची दिवाळी कर्नाटकमध्ये जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा :

एका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *