राहुल गांधींना अटक होणार ? ; रणजीत सावरकरांचं दादर पोलिसांना पत्र

रणजीत सावरकर
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय. ”स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.

त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते’, असा राहुल गांधींनी म्हंटलं होतं.

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधामुळे सावरकरप्रेमी चांगलेच खवळले आहेत. सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी तर राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये. दादर पोलिसांना पत्र लिहीत त्यांनी आपलं म्हणणं मांडलंय.

दादर पोलिसांना लिहिलेल्या पत्रात रणजीत सावरकर म्हणतात,

मी रणजित विक्रम सावरकर वय ५२ राहणार कमलकुंज, शिवसेना भवन पथ दादर (प) मुंबई ४०००२८ खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करु इच्छितो.

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशीम येथे जारी सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली असं खोटं विधान करुन त्यांची बदनामी केली आहे.

या शिवाय सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते, अशी धादांत खोटी विधानं करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे.

ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आज सकाळी (दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी) असंच वक्तव्य करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिलं.

माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यानं ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे. तरी आपण राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती.

रणजीत सावरकरांच्या पत्राची दखल दादर पोलीस घेतील का ? घेतली तर राहुल गांधींवर काय कारवाई होईल ? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *