संचारबंदीत आयपीएल सामने होणार का?

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर गोष्टी वर निर्बंध घालण्यात आले आहे.
आयपीएल मधील अनेक सामने मुंबईत होणार आहे. संचारबंदीचा या सामन्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ३० एप्रिल पर्यंत मुंबईत १० सामने होणार आहे. सामान्य दरम्यान प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आलेला नाही. सध्या मुंबई संघ बायो बबल मध्ये आहे. त्यांना सुद्धा मैदानात येई पर्यंत मास्क घालने अनिवार्य आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय सुरू राहणार काय बंद राहणार याची माहिती सांगितली. मात्र सरकारने अजूनही आयपीएल सामन्यावर बंदी आणलेली नाही. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या सामन्यावर काही फरक पडेल असे दिसून येत नाही.
आयपीएल सामने, सराव, बायो बबल बाबत
बीसीसीआय राज्यसरकारने सरकारशी चर्चा केली आहे. संघाच्या सरावासाठी बीसीसीआय राज्य सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार दोन सत्रात सराव करण्यास परवानगी दिली आहे. दुपारी ४ ते साडे सहा आणि साडे सात ते १० वाजे पर्यंत सरावाला परवानगी दिली आहे.अशा दोन सत्रात खेळाडूंना सराव करावा लागणार आहे. ठाकरे सरकारने आणलेल्या नियमात ट्रेन, बस केवळ आत्यावशक सेवा देणाऱ्यासाठीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.