राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस मिळणार का? अजित पवार म्हणाले…

पुणे : देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, आसाम, बिहार छत्तीसगड आदी राज्याने १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहे त्यावेळी याबाबतचा निर्णय ते सांगितलं असे अजित पवार यांनी संगितले.
पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लसी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ यांच्यात बैठक झाली असून त्यांनी संपूर्ण राज्याला पुरले एवढी लस देवू शकत नसल्याचे सांगितले. आमची क्षमता आहे तेवढी देवू अस पूनावाला यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने मान्यता दिल्यास इतर देशातून लस निर्यात करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर सुद्धा काढण्यात येणार आहे. सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर जिल्ह्यात दिवसाला १ लाख जणांना लस देण्याचे उदिष्ट आहे. मात्र तुटवड्यामुळे ८० ते ८५ हजार जणांनाच लस देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ऐपत असणाऱ्यांनी लस विकत घावी. ज्यांची ऐपत नसेल त्यांना राज्य सरकार नक्कीच मोफत लस देईल. ज्या प्रमाणे उज्वला गॅस योजने मध्ये देशातील नागरिकांनी आपली सबसिडी सोडली त्याचप्रमाणे लसीसाठी आवाहन करण्यात येईल. १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्यात येणार की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १ मे रोजी जनतेशी संवाद साधणार आहे त्यावेळी समजले असेही अजित पवार यांनी सांगितले.