सूर्याच्या चाहत्यांकडून ट्रेंड करण्यात येणारा #WeWantSuriya42Update हा प्रकार काय आहे?

साऊथ सिनेमाचे चाहत्यांचे तेथील अभिनेत्यांवर असणारे प्रेम जगजाहीर आहे. जय भीम आणि सुरई पोट्टारु या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा अभिनेता सूर्या चर्चेत आहे. सूर्याच्या चाहत्यांकडून ट्विटर वरती हा हॅशटॅग चालवण्यात येत आहे. पूर्वीप्रमाणेच या वेळीही साऊथ सिनेमांच्या चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या नायक ‘सर्वानन शिवकुमार’ किंवा त्याच्या स्टेज नावाने ओळखला जाणाऱ्या ‘सूर्या’ चा येणारा चित्रपट “सूर्या ४२” साठी नवीन हॅशटॅगची सुरुवात केली आहे.
वेगवेगळ्या आशयाचे सिनेमे घेऊ येणार सूर्याच्या नवीन चित्रपट “सूर्या ४२” यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. आणि याच उत्साहाने, सूर्याच्या चाहत्यांने #WeWantSuriya42Update नावाचे हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंड केले होते. लोकांनी ‘सूर्या ४२’ ला सूर्याचा ‘मच अवेटेड’ चित्रपट देखील मानला आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाच्या नावामध्ये काही बदल करण्यात येणार आहे, चित्रपटाच नाव ‘वीर’ असे असण्याची शक्यता आहे. या बाबत अभिनेता सूर्या आणि त्याच्या टीमने कुठली ही अधिकृत घोषणा केली नाही आहे.
साऊथ सिनेमाच्या चाहत्यांच वेड लावणाऱ्या प्रेमाचे अनेक उदाहरणे आहेत. सिनेमा रिलीझ दिवशी लागणारे रजनीकांतचे मोठमोठे कट उट्स असोत किंवा पिक्चर पाहण्यासाठी सरकारकडून दिली गेलेली सार्वजनिक सुट्टी, अभिनेत्यांचे मंदिरात फोटो असोत किंवा ते स्वतः दिसल्यावर देवांला वाहतो तसे मोठमोठे फुलांचे हार. या सगळ्यातून साऊथ चाहत्यांचे केवळ सिनेमासाठी असणारे प्रेम ठळक दिसते.
सूर्या ४२ चित्रपटामध्ये सूर्या सोबत मोठ्या पडद्यावर, ‘बाघी २’ आणि ‘एम.एस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली दिशा पाटणी देखील असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवकुमार जयकुमार किंवा शिवा यांनी घेतली आहे. चित्रपटात सूर्या आणि दिशा सोबत प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि कॉमेडियन योगी बाबू देखील असणार आहेत. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट एका योद्धाची गोष्ट मांडणार आहे जो १६७८ साली एका रोगाने मरण पावला. आजच्या काळात एक मुलगी त्या रोगावर संशोधन करत आहे. यावरच आधारित सूर्याचा या पूर्वीदेखील ‘चेन्नई vs चीन ‘ नावाचा सिनेमा आला होता. कदाचित येणारा सिनेमा जुन्या सिनेमाचा सिक्वल असण्याची शक्यता आहे. मात्र या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
चित्रपटाबाबत प्रेक्षकांना असणाऱ्या आतुरतेमुळे चित्रपटाच्या अपडेट्स साठी ट्रेंड होणारा #WeWantSuriya42Update हा हॅशटॅग, साऊथ सिनेमा चाहत्यांच्या प्रेमाचा ठोस पुरावा आहे. हा वेडेपणा पुढे नेत काही चाहत्यांनी सूर्या ४२ चित्रपटाचे “ट्रेलर” सुद्धा बनवले होते.
या चित्रपटाआधी अभिनेता सूर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, जय भीम चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. भारताकडून ऑस्कर साठी नामांकन यादी मध्ये हा चित्रपट देखील समाविष्ट होता. मात्र काही कारणानिमित्त या चित्रपटाची निवड करण्यात आली नाही.
अभिनेता सूर्याला २०२२ मध्ये राष्प्रती द्रौपदी मुर्मूयांच्या हस्ते त्याचा ‘सुरई पोट्टारु’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. या अभिनेत्याच्या व्हर्साटिलिटीचा त्याला प्रसिद्धी मिळवण्यात वाटा आहे, त्याचा कामामुळे त्याच साऊथ चित्रपटविश्वात एवढे नाव आहे. हा ट्रेंड होणारा हॅशटॅग, “#WeWantSuriya42Update” याच प्रमाण आहे.