Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचायाला तुमची मनुवादी मानसिकता का म्हणू नये? वंचितचा मुख्यमंत्र्यांना सवाल

याला तुमची मनुवादी मानसिकता का म्हणू नये? वंचितचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई: लॉकडाऊन बाबत बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला वंचित बहुजन आघाडीला बोलविण्यात आले नव्हते. त्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. याला तुमची मनुवादी मानसिकता हा म्हणू नये? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होते. त्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश होता. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना बोलाविण्यात न आल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करून आम्ही कामगाराचे, कारागिरांचे प्रश्न मांडत असल्याने आम्हाला बैठकीला बोलवीत नसल्याचे म्हटले आहे.


काय केले ट्वीट
लक्षावधी लोकांनी मतदान केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसंदर्भात “सर्वपक्षीय” बैठकीला बोलावत नाही याचे काय कारण असेल? आम्ही अलुतेदार बलुतेदारांचे प्रश्न मांडतो म्हणून? कामगार कारागिरांचे प्रश्न मांडतो म्हणून? याला तुमची मनुवादी मानसिकता का म्हणू नये? असे प्रश्न ट्वीट च्या माध्यमातून उपस्थित केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments