Sunday, September 25, 2022
Homeविश्लेषणात्मक तडकाअग्निपथ योजनेला विरोध का केला जातोय?, रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार???

अग्निपथ योजनेला विरोध का केला जातोय?, रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार???

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे सध्या देशात जोरदार वाद पेटला आहे. या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसतोय. विशेष म्हणजे राजकीय पक्षापेक्षा तरूणाईने या योजनेला विरोध केलाय. खास करून उत्तर भारतीय तरूणांनी या योजनेविरूद्ध दंड थोपटले आहेत. देशाच्या सुरक्षेचं कंत्राटीकरण केलं जातंय, अशी टीका करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम या राज्यातील तरूणांनी रस्त्यावर उतरून राडा घातला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर काही राज्यातील रेल्वेचे डबे पेटवण्यात आले तर काही राज्यात टायर्स जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे. तर भाजप आमदारांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली होी

तरूणाईच्या मनातील आक्रोश पाहता केंद्र सरकार देखील आश्चर्यचकित झाल्याचं दिसतंय. भारतीय लष्करात 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरूणांना ‘अग्निवीर’ म्हणून नोकरी मिळणार आहे. चार वर्षासाठी तरूणांना भारतीय लष्करात नोकरी दिली जाईल. त्यात 6 महिन्याचं प्रशिक्षण देखील असणार आहे.

चार वर्षानंतर 25 टक्के तरूणांना पुढे लष्करात संधी देण्यात येईल, त्याचबरोबर सेवा पुर्ण झाल्यानंतर निधी देखील देण्याची योजना आहे. तरूणांसाठी सुवर्णसंधी वाटत असलेल्या योजनेला मात्र तरूणांनीच कडाडून विरोध केलाय. यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे.

4 वर्षानंतर 25 टक्के अग्निवीर तरूणांना लष्कर सेवेत कायम करण्यात येईल पण उर्वरित 75 टक्के तरूणांचं काय होणार?, असा सवाल उपस्थित केला जातोय. उमेदीची 4 वर्षं लष्करात गेल्यानंतर पुढं काय करायचं असा प्रश्न तरुणांपुढे उभा राहू शकतो.

खरं तर 17 ते 21 हे काॅलेजकुमारांचं वय. आयुष्यातील सर्वात सुखद आणि महत्त्वाचे दिवस असतात. 12 वी नंतर वेगवेगळ्या फिल्डमध्ये करियर घडवण्याच्या वयात देशसेवेत 4 वर्ष जाणार आहेत. लष्करी सेवेतून बाहेर आल्यावर काय करायचं असा मोठा प्रश्न उभा राहू शकतो.

भारतीय सैन्यात एका सैनिकाला प्रशिक्षण देण्यासाठी तब्बल 8 वर्षाचा कार्यकाळ लागतो. मात्र नव्या दमाच्या तरूणांना कमी वयात 6 महिन्यात प्रशिक्षण कसं देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तरूण सैनिक समाजात वावरताना रुतबा वाढतो. मात्र असं असताना समाजाचं ‘सैन्यीकरण’ होणार नाही का ?, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल.

17 ते 21 हे चंचल वय मानलं जातं. या वयात लोभ आणि मत्सर तरूणांना विशिष्ठ कामासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे देशविघातक संघटनांच्या हाती तरूणाई जाण्याची शक्यता वाढते. आयएसआयएस प्रकरणात याची झलक अनेक देशांनी पाहिली आहे.

अग्निपथ योजनेमुळे सैन्यभरतीवर परिणाम होणार का? आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या रेजिमेंट्सचं अस्तित्व धोक्यात येणार का?, असे दोन प्रश्न विचारले जात आहेत. भारतीय सैन्यात झालेल्या बंदमुळे ब्रिटिशांनी जात आणि धर्माच्या आधारावर रिजिमेंट तयार केल्या. त्याच रेजिमेंट्स आजही कायम आहेत.

भारतीय सैन्याने युनिटीसाठी या रिजिमेंट्सचा वापर सुरू ठेवला. गोरखा रेजिमेंट, राजपुताना रेजिमेंट, जाट रेजिमेंट या सारखे रेजिमेंट सैन्य दलात आहेत. मराठा रेजिमेंट आणि महार रेडिमेंटला आता 250 वर्ष पुर्ण देखील झालीत.

अग्निपथ योजनेमुळे वर्षानुवर्ष अस्तित्व असलेल्या या रेजिमेंट्सचं अस्तित्व धोक्यात येईल का? आणि जर तसं होणार नसेल तर सेवेतून बाहेर आल्यावर समाजात वावरताना जातीय अस्मिता वाढेल त्याचं काय?

एवढ्या कमी वयात नवीन पोरं लष्करी व्यवस्थेशी जोडली जातील का?, योजनेअंतर्गत येणाऱ्या तरूणांना बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचा विपरीत परिणाम होणार तर नाही ना? भारताला युद्धापेक्षा देशद्रोहाचा आणि बंडखोरीचा धोका जास्त आहे, असा गोष्टींसाठी मॅच्यूअर व्यक्तींची सैन्यात गरज जास्त आहे, असं माजी लष्करी अधिकारी सांगतात.

इस्राईल माॅडेल…

इस्राईलमध्ये देखील 18 वयाच्या सर्व तरूणांना लष्करी सेवेचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्याकडे ती सक्तीची योजना आहे. पगार नाही तर पाॅकेटमनी दिला जातो. परंतू लहान देश असल्याने या प्रशिक्षणाचा गैरवापर इस्राईलमध्ये होत नाही, असं स्थानिक पत्रकार सांगतात. भारतात ही योजना राबवणं कितपत योग्य आहे?, हा मोठा सवालच आहे.

आमच्या नवनवीन गोष्टी वाचा-

राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागची इनसाईड स्टोरी, जशीच्या तशी..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments