ट्विटरवर पठाण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हा ट्रेंड का करतोय?

बॉलीवूड आणि त्यात होणारे बदल हे लोकांसाठी आता काही नवीन राहिलेले नाहीयेत. प्रत्येक प्रदर्शित झालेला चित्रपट,गाणं किवां नाटक घेऊन येतात एक नवीन ट्रेंड जे ट्विटर किंवा इतर सामाजिक माध्यमांवर हॅशटॅग्स च्या रूपात धुमाकूळ घालतात.अश्याच एका नवीन ट्रेंड ची सुरुवात पठाण चित्रपटाने देखील केलेली आहे.
”पठाण” चित्रपटामध्ये हिंदी सिनेमाविश्वातला सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत एकदा दिसणार आहे. शाहरुखने ४ वर्ष कुठलाही चित्रपट केला नव्हता. शाहरुखचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर बघण्याकरीता आतुर होते. शाहरुख खान सोबत पठाण मध्ये दीपिका पदुकोण देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वी आलेला आमिर खान आणि करीन कपूरचा ”लाल सिंग चड्डा” ला ‘बॉयकॉट बॉलीवूड’ यामुळे बराच पडता काळ पाहावा लागला. यामुळे प्रेक्षक शाहरुखच्या पठाण बाबत चिंतीत होते. शाहरुखच्या चाहत्यांने सुरु केलेला हॅशटॅगआहे. लोक आपल्या परिवार आणि मित्रांसोबत पठाण च्या पहिल्या शो ला जायचं आश्वासन ह्या हॅशटॅग च्या स्वरूपात मांडतायत. येत्या २५ जानेवारीला पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉयकॉट बॉलीवूड ने बऱ्याचअंशी हिंदी चित्रपटसृष्टीचा पाया हलवून टाकला होता. चित्रपट बॉक्स ऑफिस वर सलग पडत होते. नायक,नायिका,निर्माते,दिग्दर्शक,लेखक प्रत्येकाच्या पोटावर लाट बसत होती. चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाई करण्यात कमी पडत होते.
अशा प्रसंगात,शाहरुखचे चाहते त्यांच्या लाडक्या नायकाला समर्थन देण्याकरिता हा हॅशटॅग वाऱ्या सारखा पसरवतायत. जास्तीतजास्त उपयोगात आणतायत. ह्या ट्रेंड ने पठाण पहिल्या दिवशी पहिला शो बघण्याचं आव्हान प्रेक्षक करीत आहेत.
पठाण चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच चर्चेत आलेला आहे तो त्यामधील ”बेशरम रंग” या गाण्यामुळे. मात्र, आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सेन्सॉर बोर्डने काही दृश्यांना दुरुस्त करायची अट पठाणच्या निर्मात्यांना घातली आहे. गाण्याचे बोल,दृश्य विवादाच्या तावडीत आलेला आहे. आणि त्यामुळेच बॉयकॉट बॉलीवूडच्या कचाट्यात सापडण्यापासून वाचवण्याकरिता हा नवीन ट्रेंड शाहरुखच्या चाहत्यांनी सुरु केला आहे. हा हॅशटॅग पठाणला बॉयकॉटच्या कचाट्यातून वाचवू शकेल का हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल.
पण मग हा प्रश्न पडतो कि हा हॅशटॅग इतका ट्रेंड होण्या मागे मुख्य कारण काय आहे?
१ जानेवारी रोजी,दिल्लीतील कांजाला प्रकरणात झालेल्या ड्रिंक अँड ड्राईव्ह केस मध्ये पीडित अंजली या २०वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दिल्ली दुर्घटनेत आरोपींनी अंजलीला आपल्या गाडीखाली तब्बल १२ किलोमीटर्स फरफटत नेले. या घटनेत त्या मुलीची अक्षरशः हाडे तुटून पडली होती. पीडित मुलगी गंभीर रीत्या जखमी झाली होती. यातच तिचा मृत्यू झाला. ती तिच्या कुटुंबात एकमेव घर चालवणारी होती, तिच्या मृत्यूमुळे घरच्यांवर आभाळ कोसळलं. तिच्या आईची अवस्था अत्यंत खराब झाली होती.
माणुसकीचं उत्तम उदाहरण देत शाहरुख खानच्या ”मीर” संस्थेने अंजलीच्या आईला आर्थिक मदत केली आहे. ही बातमी कळताच शाहरुखसाठी असलेलं चाहत्यांचं प्रेम आणि स्नेह अनावर झाला आणि म्हणून शाहरुखला पाठिंबा देण्याकरीता त्याचे चाहते हा हॅशटॅग आगी सारखा पसरवतायत. शाहरुख ने ”मीर” संस्था त्याचे वडीलांना स्मरण करत २०१३ मध्ये स्थापित केली आहे.