भाजपचे आक्रमक खासदार तेजस्वी सूर्या अडचणीत का आलेत?

१० डिसेंबर २०२२ चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा इमरजेंसी दरवाजा एका प्रवाशाने उघडला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. ज्या प्रवाशाने हा दरवाजा उघडला होता तो प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमने केला आहे.
इमर्जंसी दरवाजा उघडला गेल्याने विमानाला दोन तास उशीर झाला. त्यावेळी त्या प्रवाशाने संबंधित विमान कंपनीची माफी मागितली, कंपनीने माफी स्वीकारली मात्र, त्या प्रवाशावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. या नंतर तो प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्य असल्याचा आरोप काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमने केला आहे. आरोप झाल्याबरोबर डिजिसीआयने चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले जोतिरादित्य सिंधिया:
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी गेल्या महिन्यात इंडिगो फ्लाइटमध्ये इमर्जन्सी गेट उघडताना झालेल्या अपघाताची माहिती दिली होती आणि त्यांनी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली होती. असे म्हणत तेजस्वी सूर्या यांना सिधियांनी पाठीशी घातले आहे.
कोण आहेत तेजस्वी सूर्या:
बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातील खासदार तेजस्वी सूर्या या भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. तेजस्वी सूर्याचे पूर्ण नाव लक्ष्य सूर्यनारायण तेजस्वी सूर्य आहे. त्यांच्या नावावर सर्वात तरुण खासदार होण्याचा विक्रमही आहे.
राजकारणी असण्यासोबतच ते वकील देखील आहेत आणि त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा त्यांनी बचाव केला होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप होता.