Saturday, October 1, 2022
HomeZP ते मंत्रालयसाउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

‘पुष्पा’, ‘प्रिय कॉम्रेड’, ‘जनता गॅरेज’, ‘रंगस्थलम’ या सर्व तेलुगु चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर हे चित्रपट हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सर्व चित्रपटांची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. जे एक प्रोडक्शन कंपनी आहे. ज्याचे टॅग लाईन-

Looking for most profitable movie makers currently in the entertainment industry.

2016 पासून चित्रपट बनवित असलेला लोकेश कनगराज यांनी अलीकडच्या काळात ‘कैथी’, ‘मास्टर’, ‘विक्रम’ सारखे दमदार चित्रपट बनविले. साउथचे कोणतेही चित्रपट हिंदी सिनेमासृष्टीत दोन प्रकारे यशस्वी मानले जातात. पाहिलं म्हणजे त्याचित्रपटांवर सिनेमागृहात पैसे कमविणे किंवा युट्युबवर चित्रपट हिंदी मध्ये डब करणे.
लोकेश कनगराजचा दिग्दर्शित ‘कैथी’ हा चित्रपट ‘भोला’ या शीर्षकासह हिंदीत बनत असून अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

मैत्री मुव्ही मेकर्सना पैसे कमावणाऱ्या दिग्दर्शकांची गरज आहे. अशात लोकेश कनगराजचे चित्रपट दमदार कमाई करत आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहिती नुसार, मैत्री मुव्ही मेकर्सना लोकेश कनगराज सोबत चित्रपट बनवायचा आहे. आतापर्यंत फक्त तेलुगू चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या या निर्मिती संस्थेला आता आपली बाजारपेठ वाढवायची आहे.

‘गॉडफादर’ या चित्रपटात सलमानची खास भूमिका

रिपोर्टनुसार, लोकेशच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे नेतृत्व सलमान खान करणार आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, सलमान त्याच्या पहिल्या तेलगू चित्रपटात दिसणार आहे.

सलमानने या चित्रपटाचे शेड्युलही शूट केले आहे. जिथे त्याने चिरंजीवीसोबत एक डान्स नंबरही शूट केला आहे. ज्याच्या कोरिओग्राफीची जबाबदारी प्रभुदेवावर होती. मात्र, मिड डेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सलमान जुलैमध्ये ‘गॉडफादर’साठी आणखी एक डान्स नंबर शूट करणार आहे. जिथे त्याची डान्स पार्टनर सुपरस्टार नयनतारा असेल.

‘गॉडफादर’मधील भूमिकेबाबत सलमानला प्रश्न विचारण्यात आला की त्याचा अनुभव कसा होता? ज्यावर सलमानने सांगितले की, चिरंजीवी त्याचा जुना मित्र आहे. तसेच हिंदी चित्रपटांतून हीरोइज़म नष्ट होत जातं आहे. साऊथच्या चित्रपटांमध्येही प्रेक्षकांना हे पाहायला मिळत आहे. यामुळेच त्यांना एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले जात आहेत.

‘गॉडफादर’मध्ये सलमानची भूमिका काही क्षणाची नसून तो एक एक्स्टेंडेड कैमियो करणार आहे. सलमानला या चित्रपटात कास्ट करण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे त्याचा चाहतावर्ग. सलमान अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे जो निर्मात्यांना पैसे मिळवून देऊ शकतो. हेच कारण आहे की, सलमानचे शेवटचे काही चित्रपट चालले नसले तरीही त्याच्या स्टारडमवर काहीही परिणाम झाला नाही.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, सलमान ‘बिग बॉस’च्या नवीन सीझनच्या होस्टिंगसाठी सुमारे 1000 कोटी रुपये मानधन घेणार आहे. ‘गॉडफादर’मधली त्याची भूमिका महत्वाची असली नसली तरीही हिंदी सिनेमासृष्टीत त्याच्या नावावर चित्रपट विकला जाईल. साऊथच्या चित्रपटात मुख्य भूमिका कधी करणार असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, हे लोक माझ्याकडे तामिळ किंवा तेलुगू चित्रपट घेऊन येत नाहीत. फक्त हिंदी चित्रपट ऑफर करतात.

सलमानला यापूर्वीही दक्षिणेतील दिग्दर्शकांकडून चित्रपटांची ऑफर आली आहे. हे चित्रपट निर्माते कोण होते हे जाणून घेऊया…

1.एटली

एटली यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत चार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यातील तीन तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते थलपति विजय यांच्यासोबत होते. ते म्हणजे ‘थेरी’, ‘मेर्सल’ आणि ‘बिगिल’ हे विजयच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे चित्रपट आहेत. एटलीने मोजक्याच चित्रपटांतून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

शाहरुख जेव्हा कमबैक प्लान करणार होते तेव्हा त्यांनी या गोष्टीचा नक्कीच विचार केला असेल. शाहरुख आणि नयनताराचा ‘जवान’ हा एटलीचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. पण ‘जवान’च्या आधीही एटलींना हिंदी चित्रपट बनवायचा होता.मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी त्याने सलमान खानला एक नाहीतर अनेक प्लॅनसह अप्रॉचही केले होते. पण काम काही झाले नाही.

2.लोकेश कनगराज

लोकेश कनगराजने 2021 मध्ये भारतीय सिनेमाला पहिला मोठा चित्रपट दिला, तो म्हणजे ‘मास्टर’. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत तंतोतंत आकडा नाही, परंतु असे म्हटले जाते की, त्याचे जगभरातील कलेक्शन 250 ते 300 कोटींच्या दरम्यान होते. ‘मास्टर’ सुपरहिट झाल्यानंतर मुराद खेतानीने त्या चित्रपटाचे हिंदी रिमेकचे राइट्स विकत घेऊन ‘कबीर सिंग’ चित्रपट निर्मिती केला.

प्लान होता की, थलपथी विजय ऐवजी सलमान हिंदी रिमेकमध्ये मध्ये दिसणार पण या चित्रपटाच्या रिमेकमुळे सलमान खूश नव्हता. परिणामी हा प्रकल्प रखडला.

3.शंकर

1993 पासून चित्रपट बनविणाऱ्या शंकरला प्रेक्षक ‘रोबोट’ आणि झी सिनेमाच्या आवडत्या ‘अपरचित’ने ओळखतात. शंकरच्या चित्रपटातील नायक साधारणपणे लार्जर दैन लाइफ प्रकाराचे असतात. हेच एक कारण आहे की, शंकरचे जवळजवळ प्रत्येक चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाले आहे. 2021 मध्ये शंकरने त्याच्या नवीन चित्रपट ‘RC 15’ ची घोषणा केली. या चित्रपटासाठी राम चरण आणि कियारा अडवाणी एकत्र काम करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार , शंकरचा हा एक पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसारनुसार, मुख्य पात्रांव्यतिरिक्त चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती ती म्हणजे पोलिसाची जे चित्रपटाच्या स्टोरीला समोर नेते. या भूमिकेसाठी निर्मात्यांना एका अभिनेत्याला साइन करायचे होते ज्याची स्क्रीन प्रेझेन्स मजबूत आहे. या भूमिकेसाठी शंकरला सलमानला आणायचे होते परिणामी शंकर राम चरणसह सलमानलाही भेटणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स मध्ये आले होते. दोघांमध्ये बातचीतही झाली परंतु या चित्रपटात कॅमिओ करायला सलमान राजी झाला नाही.

3.त्रिविक्रम श्रीनिवास

‘अला वैकुंठपुरामुलो’ ​​आणि ‘भीमला नायक’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या त्रिविक्रम श्रीनिवासलाही सलमानसोबत काम करण्याची इच्छा होती. त्यांची ‘अथाडू’ नावाची स्टोरी होती. जो त्याला हिंदीत बनवायचा होता. त्रिविक्रमला त्याचा प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता सलमान खान योग्य वाटत होता. स्क्रिप्ट फायनल झाली. सलमानने स्क्रिप्ट ऐकावी अशी निर्मात्यांची इच्छा होती.

निर्मात्यांने सलमान जवळ जायचे प्रयत्नही सुरू केले. पण सलमानला स्टोरी ऐकायला वेळ मिळत नव्हता आणि प्रोजेक्ट साठी वेळ निघून चाला होता. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी तीच स्क्रिप्ट महेश बाबूला ऐकवली. महेशने ती मान्य केली. अखेर, त्रिविक्रमने स्टोरी तेलुगुमध्येच झाली.

4.शंकर

1993 पासून चित्रपट बनविणाऱ्या शंकरला प्रेक्षक ‘रोबोट’ आणि झी सिनेमाच्या आवडत्या ‘अपरचित’ने ओळखतात. शंकरच्या चित्रपटातील नायक साधारणपणे लार्जर दैन लाइफ प्रकाराचे असतात. हेच एक कारण आहे की, शंकरचे जवळजवळ प्रत्येक चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाले आहे. 2021 मध्ये शंकरने त्याच्या नवीन चित्रपट ‘RC 15’ ची घोषणा केली. या चित्रपटासाठी राम चरण आणि कियारा अडवाणी एकत्र काम करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार , शंकरचा हा एक पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसारनुसार, मुख्य पात्रांव्यतिरिक्त चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती ती म्हणजे पोलिसाची जे चित्रपटाच्या स्टोरीला समोर नेते. या भूमिकेसाठी निर्मात्यांना एका अभिनेत्याला साइन करायचे होते ज्याची स्क्रीन प्रेझेन्स मजबूत आहे. या भूमिकेसाठी शंकरला सलमानला आणायचे होते परिणामी शंकर राम चरणसह सलमानलाही भेटणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स मध्ये आले होते. दोघांमध्ये बातचीतही झाली परंतु या चित्रपटात कॅमिओ करायला सलमान राजी झाला नाही.

5.कोरतला सिवा

या वर्षी कोरतला सिवा यांचा ‘आचार्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जिथे चिरंजीवी आणि राम चरण यांनी स्क्रीन शेअर केली. सलमान चित्रपटात कॅमिओ करू शकतो, अशा बातम्या या चित्रपटाविषयी होत्या. मात्र, त्यानंतर निर्मात्यांनी कधीही सलमानला अप्रोच केले नसल्याचेही वाचण्यात आले.

कोरतला सिवाच्या कोणत्याही प्रोजेक्टशी सलमानचे नाव जोडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. कोरतलाने ज्युनियर एनटीआरसोबत ‘जनता गॅरेज’ चित्रपट हि बनवला होता.. हा चित्रपट हिंदीतही बनणार असल्याची बातमी आली. ज्यासाठी प्रॉडक्शन कंपनीला सलमानला घ्यायचे होते. पण असे काही झाले नाही.

मात्र, मैत्री मुव्ही मेकर्स बऱ्याच दिवसांपासून सलमानसाठी डायरेक्टर शोधात आहे. ‘पुष्पा’ बनवणाऱ्या सुकुमार आणि कोरतला यांचे नाव सुचविले गेले होते. मात्र त्यांच्याकळे वेळ नसल्याने काम होऊ शकले नाही. आता लोकेश हा नवा दिग्दर्शक होऊ शकतो जो मैत्रीला त्याचा पहिला हिंदी चित्रपट देईल.

अधिक वाचा :

शास्त्रीच्या विनंतीवर मनोक कुमारने ‘उपकार’ चित्रपट बनविला, पण…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments