‘कोण होणार करोडपती’चं नवीन पर्व, मिसकॉल देऊन व्हा सहभागी!
मुंबई: अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ प्रचंड लोकप्रिय आहे. हा रिॲलिटी शो अनेक राज्यांमध्ये त्या-त्या भाषेत त्यांच्या राज्यातील लोकप्रिय कलाकारांना घेऊन सुद्धा केला जातो. २०१९ मधे सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’ या शो च्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. इतकंच नव्हे तर या शो चं टायटल ट्रॅकही त्याला गायला सांगितलं होतं.
‘उत्तर शोधले की जगणे बदलते’ या टॅगलाइनसह हा रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या रिअॅलिटी शोचे नवीन पर्व येण्यास सज्ज झाले आणि पर्वाचा लोगो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार या बाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली.
मराठी घरा घरात सचिन खेडेकर सगळ्यांना परिचित आहेत. आपल्या देहबोली आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
या वर्षी कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत.
गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणे शक्य झाले नाही. आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल या दरम्यान ८०८००४४२२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करू शकतात.