Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचावाझेंचा धनी अनिल देशमुख तर देशमुखांचा धनी कोण? गोपीचंद पडळकरांचा सवाल

वाझेंचा धनी अनिल देशमुख तर देशमुखांचा धनी कोण? गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आले होते. त्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वाझेंचा धनी अनिल देशमुख तर देशमुखांचा धनी कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच आरोपाची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली होती.
परमवीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी असा आदेश दिला आहे.
आता सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुख यांच्या घरावर, कार्यालयावर १० ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे.
आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करताना न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हे तर जगजाहिर झाले आहे की, सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख. आता फक्त एकच प्रश्न ‘
देशमुखांचा धनी कोण?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments