|

मनसुख हिरेन प्रकरणात नाव आलेले धनंजय गावडे कोण आहेत?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरण सध्या गाजत आहे. त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे बरोबर धनंजय गावडे कोण आहेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटके भरून वाहन आढळले होते. त्यानंतर प्रचंड खळबळ माजली होती. ते वाहन ठाण्यातील मनसुख हिरेन या व्यापाऱ्याचे असून हे तपासात समोर आले होते. त्यानंतर काही दिवसानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात आढळून आला होता. गाडीच्या शोधानंतर मनसुख हिरेन पोलिसांसमोर हजरही झाले होते.  

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मनसुख हिरेन ठाण्याचे, सचिन वाझे ठाण्याचे गाडी ठाण्याची आहे. या गाडी सोबत एक तर गाडी आली ती सुद्धा ठाण्यावरून आल्याचे त्यांनी सांगितले होते.

मंगळवारी पुन्हा एकदा सभागृहात मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची पत्नीने पोलिसांना दिलेला जबाब वाचून दाखविला. आणि त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचे सांगितले. म्हणून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली.

त्यालाच धरून फडणवीस यांनी जुन्या एका खटल्याचा दाखला देत अटकपूर्व जामीनासाठी सचिन हिंदुराव वाझे आणि धनंजय विठ्ठल गावडे असे नाव होते. मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन धनंजय गावडे यांच्या जवळ आहे. ४० किलोमीटर त्यांची बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय, गावडेच्या जवळ शेवटचे ठिकाण आहे. असे सांगून फडणवीस यांनी सांगितले.

कोण आहे धनंजय गावडे

धनंजय गावडे हे वसई विरारच्या महापालीकेतील शिवसेनचे माजी नगसेवक आहेत. गावडे हे पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. २०१५ मध्ये शिवसेनच्या तिकिटावरून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१७ साली जमीन हडपल्याच्या त्यांच्यावर आरोप झाला. यामुळे त्यांना २०१७ मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. २०१६ मध्ये त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला होता. त्यात ४० लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. २०१८ मध्ये त्यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इतरही गुन्हे असून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केले आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *