|

कडक निर्बंध लावताना मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पासून कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, राज्यात निर्बंध लावताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे सांगत शब्दाचे खेळ केले आहे. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबाला स्वस्तात धान्य मिळत त्यांना दरमहा प्रती कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागत. राज्य सरकारने या कुटुंबाना महिनाभरात मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी १०५ रुपयांचा भार सोसावा लागणार आहे.

रिक्षा चालक दर महिन्याला सरासरी १० हजार कमवत असतात त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजारांची घोषण सुद्धा तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्या मदत करण्यासाठी च्यां घोषणा फसव्या असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *