|

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाऊनविषयी जनतेत भिती पसरवू नये-आमदार गोपीचंद पडळकर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्ह येऊन लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. लॉकडाऊन विरोध असल्याचे सांगत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?

मुख्यमंत्री महोदय, काल रात्रीच फेसबुक लाईव्ह नेमकं कश्यासाठी होत? मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. याने सामान्य जनतेत काय संदेश जातोय? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. आणि तुम्ही कसला हा लॉकडाऊन – लॉकडाऊन काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही? एक वर्ष झालं तरी तेच तेच पाल्हाळिक बोलताय. कोरोनाचा प्रसार तुम्हाला रोखता आला नाही. हे आतातरी स्पष्टपणे कबूल करा अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय करोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा…
बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनचं रोखाव किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबूक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालायत का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवाव असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

सरकारचं सगळं पाप जनतेच्या माथी मारून जनतेलाच ‘बेदरकार’ म्हणायचं, राज्याचे प्रश्न सोडून बंगालमध्ये ममता दिदिनं लावलेल्या ‘दिव्याचं’ कौतुक करायचं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेल्या अंधारकडं सोयीस्कर दुर्लक्ष करायचं, असं उठसुठ सामानाच्या अग्रलेखातून बरळणाच्या उद्योग सुरू असल्याचे सांगत जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच काम सरकारनं करु नये असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *