जिथे चालतो राजकारण्यांपेक्षा ‘सेलिब्रेटींचा’ बोलबाला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येत. तामिळनाडूच्या राजकारणात विचारधारेवरून कालवाकालव होणं नेहमीचं आहे. रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढणार असल्याची प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्षांमध्ये  खूप चर्चा झाली होती. परंतु त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढणार नसल्याचं म्हटलं आहे. पण जर त्यांनी पक्ष काढला असता आणि राज्य पिंजून काढत प्रचार केला असता तरी त्यांना तामिळनाडूची राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता होती. देशात असं कुठेही कधीही झालेलं नाही. चित्रपट विश्वातून आलेली सेलिब्रेटी त्यांच्याबरोबर माणसांचे जत्थे घेऊन येतात. तामिळनाडूच्या राजकारणावर अगदी स्वतंत्र राज्याच्या पहिल्या दिवसापासून सिनेमा आणि त्यांच्यातल्या व्यक्तीचा प्रभाव राहिलेला आहे. भाजपात रजनीकांत येणार असल्याची शक्यता होती. भाजपला असं वाटतं की रजनीकांत केवळ गर्दी नव्हे मतंही आणतील. म्हणूनच भाजप सातत्याने रजनीकांत यांना रिंगणात आणू पाहतंय.

दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेतल्या चित्रपटांची सद्दी असते. मनोरंजन माध्यम म्हणून सुरु होऊन आज सामाजिक विषय पोचवण्यापर्यंतच्या प्रवासात त्यानं अनेक टप्पे बघतले. तिथे हिंदी चित्रपट स्थानिक चित्रपटांच्या तुलनेत कमी धंदा करतात. इथे कोणी आक्षेप घेत नाही. कारण तिथे त्या प्रेक्षकांचीच तशी मागणी असते. दक्षिणेकडे लोक तेथील सुपरस्टार्सला अगदी डोक्यावर घेतात हे आपण नेहमीच पाहतो. याबरोबरच येथील सुपरस्टार्स देखील संकटकाळात समाजाला सढळ हातांनी मदत करताना दिसतात. म्हणूनच तेथील प्रेक्षक हा प्रकर्षाने व्यक्तिपूजक जाणवतो . येथील लोक हे या राज्याचा अगदी पहिला मुख्यमंत्री हा चित्रपट क्षेत्रातून होता यावरुन आपल्याला याची प्रकर्षाने जाणीव होऊ शकते. देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येत. त्याचा वापर राजकीय प्रपोगांडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. राजकीय कारकिर्दीसाठी सिनेमॅटिक पार्श्वभूमीची गरज असते हा निष्कर्ष आपण तामिळनाडूच्या राजकारणाकडे पाहून काढू शकतो.

अण्णादुराई

१९६७ साली ‘द्रविड़ मुन्नेत्र कड़गम’ पक्ष सत्तेत येऊन अण्णादुराई तामिळनाडू राज्याचे पाहिले मुख्यमंत्री बनले. राजकारणात येण्यापूर्वी ते सिनेमा आणि नाटकात पटकथालेखक म्हणून काम करत होते. अण्णादुराई हे पत्रकार म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी १९४८-१९७८ पर्यंत एकूण १० चित्रपटांसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखक म्हणून काम केलं. १९४९ ला आलेला “वेलैकरी” हा लेखक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. १९४९ साली अण्णादुराईनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पुढे १९६७ साली अण्णादुराई यांचा द्रमुक पहिल्यांदा सत्तेत आला आणि अण्णादुराई मुख्यमंत्री झाले. पुढे १९६९ साली मुख्यमंत्री असतानाच त्याचं कर्करोगानं निधन झालं. 

एम. करुणानिधी

अण्णादुराई यांच्या अचानक निधनाने १९६९ साली मुखमंत्री पदाची जबाबदारी एम. करुणानिधी यांच्यावर येऊन पडली व ते राज्याचे दुसरे मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी पाच वेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. तामिळ चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक म्हणून त्यांचं मोठं नाव होतं. एम. करुणानिधींचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. द्रविड चळवळ आता कदाचित पूर्वी इतकी जोमात उदयास येईल ही आशा संपुष्टात आली. एकंदरीत दक्षिणेच्या राजकारणात कार्यकर्ते जीव ओवाळून टाकतील असा नेताही आता राहिलेला नाही. १९७२ साली करुणानिधी आपल्या मुलगा मुथूला एकाच वेळी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर प्रस्थापित करण्यासाठी हालचाली करत होते. वारसदार असलेला स्टालिन उदयोन्मुख नेतृत्व म्हणून तामिळी जनतेनं नाकारला होता.

एम जी रामचंद्रण  (M.G.R)

एमजीआर या नावाने प्रसिद्ध असलेले तमिळ चित्रपटातील अतिशय मोठे नाव होते. कला विश्वातून राजकारणात प्रवेश करणारे ये तामिळनाडूतील प्रथम व्यक्ती होते. त्यांनी सुरुवातीला सी. एन. अन्नदुराई यांच्या द्रमुक पक्षात प्रवेश केला होता. परंतु अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे एम जी रामचंद्रण यांनी अण्णा द्रविड़ मुनेत्र कड़गम पक्षाची स्थापना केली. (जो पक्ष नंतर अखिल भारतीय अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम या नावाने नावारूपास आला). १९५३ सालाच्या आसपास तमिळ चित्रपट सृष्टी मधले सगळ्यात मोठा नायक MGR म्हणजेच एम. जी. रामचंद्रन यांची DMK मध्ये सभासदत्व स्वीकारलं. उमदा नायक म्हणून प्रचंड लोकप्रियता असणा-या MGR ना DMK मध्ये स्वत:भोवती महत्वांकित वलय निर्माण करायला फारसा वेळ लागला नाही. १९७७-८० ते १९८० ते १९८४ दरम्यान ते तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना १९८८ मधे भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.

व्ही. एन. जानकी

MGR यांच्या आकस्मिक निधनामुळे, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री व्ही. एन. जानकी यांच्यावर आली. त्यांनी २३ दिवस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

जयललिता

तामिळ चित्रपटांमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून त्या नावाजलेल्या होत्या. राजकीय कारकिर्दीपूर्वी त्यांनी ३०० तामिळ सिनेमांमध्ये काम केलं. १९६५ तो १९८०च्य काळात त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्री होत्या. अम्मा या नावाने जयललिता प्रचलित होत्या. १९६० ते ७० च्या दशकात एम. जी. रामचंद्रन यांच्यासोबत अनेक चित्रपटात त्यांची जोडी हीट ठरली. १९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांनी जयललीता यांना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश दिला. सर्वाधिक लोकप्रिय राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. पुढची अनेक दशकं तरी अम्मांचं नाव देश विसरणार नाही. १९९५ मध्ये त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. सर्वात लहान वयात मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१५ मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यावर २०१६ मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. ३२ वर्षात पुन्हा सत्तेवर येणार्‍या त्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या.

कमल हसन

तामिळ चित्रपट सृष्टीतला लोकप्रिय अभिनेता म्हणजे कमल हसन हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. अभियाना बरोबर त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये देखील तितकेच नाव कमावले आहे. अलीकडेच त्यांनी म्हणजेच २०१८ मध्ये ‘मक्कल निधी मय्यम’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि सक्रिय  राजकारणात जाहीररित्या प्रवेश केला. तर येत्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ते त्यांच्या सहकारी पक्षासोबत एकूण १५४ जागा लढाविण्याचे ठरवले आहे.

दक्षिणात्य राजकारणाचा सिनेमा हा अविभाज्य घटक आहे. तरीही आता या पुढच्या तमिळनाडूत एकतर संपूर्ण राजकारणी असलेल्यांना नेता म्हणून स्विकारण हा एक पर्याय राहतो. कमल हसन, रजनीकांत सारख्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश करतील की नाही हे महत्वाचे ठरणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *