| |

“जब-जब राजनीति लड़खड़ाती हैं तब उसे साहित्यही संभालता हैं”

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राजकारण व साहित्याचा संबंध तसा इतिहासा पासूनच आहे. साहित्य मध्ये ‘राजनीतिक काव्यधारा’ ही एक वेगळीच शाखा निर्माण झाली होती. एकंदरीत राजकीय साहित्य विषयी बोलताना राष्ट्र कवी रामधारी सिंह दिनकर यांचा दाखला देणे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण साहित्यिक इतिहासातील रामधारी सिंह हे खूप मोठे राष्ट्रकवि होऊन गेले. त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रकवी’ म्हणून हाक मारणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते. हो आज आम्ही तुम्हाला पंडित नेहरू आणि रामधारी दिनकर यांचा एक रंजक किस्सा सांगणार आहोत.

१९३० चा काळ होता तेव्हा देश राजकारणात सक्रिय होत चालला होता. गांधीजींच्या नेतृत्वात सविनय कायदेभंग आंदोलन चालू होते. रामधारी सिंह या आंदोलनाला जोडले गेले. त्यांचे शस्त्र म्हणजे त्यांची लेखणी. त्यांनी त्यांच्या कवितांनी इंग्रजी राजवटीवर घणाघाती प्रहार केला, त्यांचे साहित्य म्हणजेच एक प्रकारचा विद्रोह होता.

लहान वयात वडिलांचे निधन आणि कुटुंबाची जबाबदारी सर्वस्वी दिनकर आणि त्यांच्या मोठ्या भावावर आली होती. तेव्हा दिनकर च्या मोठ्या बंधूंनी स्वतः न शिकता दिनकरला शिक्षण देण्याचे ठरवले. दिनकर आणि पुढे जाऊन आर्थिक परिस्थितीमुळे ब्रिटिश सरकारची नोकरी स्वीकारली पण त्यांच्या विद्रोही लिखाणामुळे त्यांच्या शासकीय नोकरीत अनेक अडथळे यायचे. चार वर्षाच्या काळात त्यांची तब्बल बावीस वेळा बदली करण्यात आली होती. शेवटी १९४५ मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

दिनकर यांचे आवडते नेते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि दिनकर यांच्यात खूप घनिष्ट मैत्री होती. नेहरू हे दिनकर यांच्या कवितेचे चाहते होते. त्यांच्या याच मैत्रीमुळे नेहरूंनी दिनकर यांना सक्रिय राजकारणात सामील करून घेतले. १९५२ मध्ये दिनकर राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे १९६४ पर्यंत ते सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

सत्तेत असताना देखील त्यांनी विरोधकांवर आणि स्वतःच्या पक्षातील काही धोरणांवर टीका ते उघड पणे करत असत. गरीब मजूर कामगार आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते वारंवार आवाज उठवित असायचे. एकदा सर्व भाषा संमेलनाच्या वेळेस असा प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाची आठवण आजही अनेक राजकीय विचारवंतांच्या तोंडून आपण ऐकत असतो. तत्कालीन भारताच्या संसदेमध्ये एक साहित्यिक विभाग चालत असायचा. त्याचे प्रमुख म्हणजे रामधारी सिंह दिनकर. तर त्या संमेलनाचे उद्घाटक पंडित नेहरू होते. संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पायर्‍या चढताना नेहरू कोलमडले तेवढ्यात त्यांच्या मागून येणाऱ्या रामधारी दिनकर यांनी नेहरूंना सावरले. त्याचक्षणी नेहरूंनी दिनकर यांचे आभार मानले. तेव्हा दिनकरांचे प्रत्युत्तर अत्यंत समर्पक असे होते. दिनकर म्हणाले, “नेहरूजी, धन्यवाद देने की कोई भी जरूरत नही हैं, क्यू कि जब-जब राजनीति लड़खड़ाती हैं तब उसे साहित्यही संभालता हैं.’


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *