जेंव्हा एका ‘गझल’ मुळे इंदिरा-सरकार विचलित झाले होते…
दुष्यंत कुमार त्यागी हे आधुनिक हिंदी साहित्याचे भारतीय कवी होऊन गेले. विसाव्या शतकातील हिंदी कवी व गझलकार म्हणून ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३१ चा. मुरादाबाद मधून त्यांनी बीएड शिक्षण पूर्ण करून १९५८ मध्ये दिल्लीमधील आकाशवाणीला नोकरीस लागले. आणीबाणी च्या काळातली जुलूमशाही पाहून त्यांचा सरकारप्रति आक्रोश, राग त्यांच्या गझल आणि कविते मधून व्यक्त व्हायचा. या सर्व कालावधीत त्यांची चळवळ ही गजले कवितां मार्फत चालूच राहिली ‘ साये मे धूप ‘ नावाचा त्यांचा गझल संग्रह त्याच दरम्यान प्रकाशित झाला. ७० च्या दशका तील वातावरण असे होते की सत्तेच्या विरोधातला राग सगळीकडेच जाहीरपणे उघड होत होता. आणीबाणी च्या विरोधातले पडसाद उमटत होते. त्याच दिवसात एकीकडे सिनेमांमधून अमिताभ बच्चन लोकप्रिय होत चालले होते तर एकीकडे कवितां मुळे दुष्यंतकुमार लोकांचे प्रिय होत होते. एक ते दुष्यंत कुमारच होते जे उघडपणे त्यांच्या गझल आणि कविता या सत्तेच्या विरोधात असायच्या, ” मत कहो आकाश में कुहरा घना है, यह किसी की व्यक्तिगत आलोचना है “!
“सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए” या दुष्यंतकुमारच्या ओळी आणीबाणीच्या विरोधातल्या चळवळीच्या ओळी बनल्या, चळवळकर्त्यांच्या तोंडी दुष्यंतच्याच कविता आणि गझल निनादू लागल्या. भूषण चा जन्म उत्तर प्रदेशच्या बिजनेर जिल्ह्यातील राजपूर नवाडा या गावात झाला. इलाहाबाद मध्ये त्यांचे शिक्षण चालू असताना त्यांची मैत्री कथाकार कमलेश्वर यांच्या सोबत झाली. दुष्यंतलाही ही हळूहळू कविता, गीत, गझल, काव्य-नाटक कथा इत्यादींचे लेखन करायला आवडत गेले.
त्यांच्या लिखाणामध्ये नव्या पिढीच्या रागाचे आणि नाराजीचे भाव उतरायचे. त्यांचे हेच लिखाण ज्वलन शील आणि परखड गझल आणि कविता ह्या आंदोलनकर्त्यांना भावायच्या. आपणही जेव्हा त्यांच्या कविता वाचू तेव्हा समजू की त्यांच्या लिखाणात किती ताकद होती. ज्या घोषणा आंदोलनामध्ये उमाटायच्या त्या एका तरुण गझलकारांच्या ओळी होत्या. २०११ मध्ये झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनात देखील त्यांच्या ओळी घोषणाद्वारे दुमदुमल्या. दुष्यंतच्या लिखाणामुळे कित्येक आंदोलनाला जीवदान मिळाले. त्याची गझल हे क्रांतीचे स्वरूप होते. दुष्यंत हा पहिला असा गझलकार होता जो सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहीत असायचा. त्यांच्या शायरी-मधील एक एक ओळ लाखोंच्या मनात क्रांतीची जाणीव करून देणारी होती.
निवडणुकीत केले गेलेले ‘गरिबी हटाव’ असे नारे त्यांना पोकळ वाटायचे. महागाई वाढतच होती सामान्य गरिबांच्या आयुष्यातील दैनंदिन वस्तू देखील महाग होत चालल्या होत्या. ही सर्व परिस्थिती दुष्यंतला बोचत असे. सामान्यांच्या मनात गरिबी हटाव साठी विद्रोह उभा होता आणि दुष्यंत लिहीतच होता.
” कहा तो तय था, चिराग़ हर एक घर के लिये,
कहा चिराग मयस्सर नही शहर के लिए,
यह दरखातो के साये मे धूप लगती है
चालो यहांसे चले उम्र भर के लिये!”
७० च्या दशकाच्या सुरुवातीला आजादी साठी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात आजादी साठी आंदोलन चालू झाले. नारायण यांच्या सोबत असलेल्या प्रत्येक एका आंदोलन करते त्याच्या तोंडी दुष्यंत च्या ओळी होत्या. सोप्या सरळ भाषेत असणारा या कवितेच्या ओळी आंदोलनाचा आवाज बनल्या. एकीकडे सरकारी नोकरी आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधात असलेली नाराजी अशा द्विधाअवस्थेत असणाऱ्या दुष्यंत कुमारचा आक्रोश हा वारंवार त्यांच्या गझलेतून व्यक्त व्हायचा. तत्कालीन सरकार इंदिरा गांधींच्या कडक शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत अनेक आजादी आंदोलन व्हायची. तेव्हाच भूषण च्या ह्या ओळी,
” एक गुडिया की कही काठपुतलीयों में जान हैं,
और आज शायर ये तमाशा देख कर हैरान है!”
त्यांच्या अशा विद्रोही लिखाणामुळे त्यांना अनेकदा सरकारच्या समोर अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण ते मागे हटले नाही.
त्याच काळात बस्तरचे जनप्रिय बंजदेव महाराज यांचा पोलिसांच्या फायरिंग मध्ये मृत्यू झाला आणि याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले. बंजदेव महाराज हे आदिवासी समाजाच्या विकासासाठी लढायचे. त्यामुळे आदिवासी लोकांचे ते प्रेरणास्त्रोत होते. त्यामुळे संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. हे सर्व पाहून दुष्यंतकुमार देखील विचलित झाला. त्याने निरंकुश सरकारी व्यवस्थेच्या विरोधात कविता लिहिली. आणि ह्या कवितेची लोकप्रियता इतकी वाढली होती की, ही बातमी मध्यप्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री द्वारिकाप्रसाद मिश्रा यांनी दुष्यंत कुमार ला भेटायला बोलावले. भूषण त्यांनी प्रश्न केला, ” सरकारी पदावर असताना तुम्ही सरकारच्या विरोधात कविता लिहित आहात हे तुम्हाला कितपत योग्य वाटते?” तेव्हा दुष्यंतकुमार ने उत्तर दिले कि, “तुम्ही या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळत आहात, तुम्ही देखील कवि आहात, तुम्हीच सांगा, तुम्ही जर फक्त एक कवी असलात तर तुम्ही काय लिहीलं असतं?” यावर मुख्यमंत्री देखील निरुत्तर होते.
हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए
आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए
हर सड़क पर हर गली में हर नगर हर गाँव में
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए
सिर्फ़ हंगामा खड़ा करना मिरा मक़्सद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही
हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए.. तर अशाप्रकारे दुष्यंतकुमार हे त्यांच्या शब्दसामर्थ्यामुळे क्रांतीचे एक बीज बनले आणि कित्येकांना त्यांच्या लिखाणाद्वारे प्रेरणा देऊ केली.