जेव्हा गडकरी बिग बीं ना म्हणाले, ‘नाटक मत कर,रख फोन नीचे’

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

“आपण लोकांवर उपकार करत नाही, लोकांची काम करण्यासाठीच आपण या पदावर आलो आहोत. लोक आपल्याला निवडून देतात याचाच अर्थ त्यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला असतो. त्यांच्या अडचणी आणि कामं घेऊन ते आपल्याकडे येतात अशा वेळी त्यांच्या अडचणी समजून घेऊन तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाच पाहिजे.” असं म्हणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी हे त्यांच्या कामाप्रती तत्पर असतात. गडकरी यांच्या कामाचा धडाका तर पक्ष कार्यकर्त्यांच्या सह देशातील सर्वच नागरिकांना माहिती आहे. त्यांच्या या ‘गडकरी पॅटन’चे अनेक जण ‘फॅन’ आहेत. त्यातले एक म्हणजे अमिताभ बच्चन होय.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग या आपल्या खात्यात त्यांनी आत्तापर्यंत  पूर्णत्वास नेलेल्या प्रकल्पांपैकी, एक प्रोजेक्ट जो आहे तो विशेष कौतुकास्पद ठरतो. तो म्हणजे मुंबई -पुणे एक्सप्रेस वे. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे पूर्ण झाल्यानंतर अमिताभ बच्चन ह्यांनी पहिल्यांदा या महामार्गावरून प्रवास केला आणि या अशक्यप्राय प्रकल्पाची दाद देण्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांना फोन केला होता.

एका वेबसंवादच्या निमित्ताने गडकरी यांनी, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते सांगतात कि, त्यांच्या महाविद्यालयीन वयात त्यांनी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट त्या काळात तिसऱ्या श्रेणीत बसून खूप चित्रपट पाहिले. तेव्हा तिकीट असायचं फक्त १ रु,५० पैसे, अमिताभचे मारामारी, हिरोगिरी असणाऱ्या चित्रपटाचं त्यांना फार आकर्षण वाटायचं. त्यांच्या ११/१२ वी च्या काळात जवळपास सगळीकडेच अमिताभ बच्चन यांची जादू होती.

हा किस्सा सांगताना गडकरी म्हणाले कि, त्यांनी त्यांच्या आईची एक शिकवण सांगितली, “कुणाला जर मदत केली, चांगली काम केले तर ते झाल्यावर तिथेच विसरून जायचे, त्याचा उल्लेख करायचा नाही. आपण स्वतःहून त्या कामाच्या बाबतीत बोलण्यापेक्षा लोकांनी त्याची आठवण काढण्यामध्ये मोठेपणा असतो.”त्याचप्रमाणे गडकरी सांगतात कि त्यांनी यशस्वी केलेला पुणे-मुंबई महामार्गाचा प्रकल्प त्यांनी फारसा लक्षात ठेवला नाही. आणि एक दिवस त्यांचा फोन वाजला आणि गडकरींनी फोन उचलला आणि “कौन बोल रहा हैं?” तिकडून आवाज आला कि,’अमिताभ बच्चन बोल रहा हूं ‘ त्यावर गडकरी यांना वाटले कि कुणीतरी त्यांची मस्करी करत असणार, म्हणून त्यांनी वैतागून बोलले कि, ” नाटक मत कर, रख फोन नीचे” म्हणत फोन कट केला. नंतर पुन्हा त्यांना फोन आला आणि पुढून आवाज आला कि, “नितीनजी, सच में मै अमिताभ बच्चन बोल रहा हूं!” तेव्हा गडकरींना वाटले की काहीतरी गडबड झाली हे खरंच अमिताभ बच्चन बोलत आहेत. त्यावर गडकरी यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली आणि म्हणले कि, “मला तुमचा फोन येणे हे अपेक्षित नव्हते म्हणून मला वाटले की कोणीतरी माझी चेष्टा करत आहे.” अमिताभ यांनी गडकरींना उत्तर दिले की, “मी आज फोन एका विशिष्ट कामासाठी केला आहे. पुण्यात माझे शूटिंग चालू होते, फ्लाइट च्या वेळेपर्यंत माझे काम होऊ शकले नाही त्यामुळे मी पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास केला. हायवे बनवल्यानंतर पहिल्यांदाच मी हाय-वे वर प्रवास केला, इतकं नियोजनबद्ध बांधकाम आणि चांगल्या प्रतीचा महामार्ग बघून मला खूप आनंद झाला कि आपल्या देशात चांगले-चांगले रस्ते आणि महामार्ग बनले आहेत. पण मी तुमचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मला माझे चाहते मी एखादा चांगला चित्रपट बनवला की, ते सहा महिने वगैरे बघत असतात, संगीत -गाणे- कथानक असं जर सगळंच चांगलं असेल तर तो चित्रपट प्रेक्षक एखादे वर्ष आठवणीत ठेवतो. पण आम्ही मुंबईकर जनता तुम्ही बनवलेले ५५ पेक्षा अधिक उड्डाणपुल आणि सर्व महामार्ग आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण या चांगल्या रस्ते -महामार्गमुळे तुम्ही आमचे जीवन सुखकारक बनवले आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार”. गडकरींना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचा फोन आला, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि ‘अमिताभ जी मी तुमच्या अभिनयाचा आणि तुमचा मोठा चाहता आहे. तुमचे सर्व चित्रपट मी आवडीने बघतो. तुमचा ‘दीवार’, ‘जंजीर’ आणि ‘आनंद’ हे असे अनेक चित्रपट मी खूपदा पाहतो अशाप्रकारे गडकरी बोलतच राहिले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *