जेव्हा इंजेक्शन मिळून देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी हतबल होतात

पुणे: शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला आहे. आयसीयु बेड मिळावा म्हणून अनेक जण ताटकळत थांबले आहेत. गेल्या काही दिवसा पासून पुण्यात कोरोना बाधित गंभीर रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहेत. बाधितांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी हतबल होत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी हतबल असल्याचे पाहायला मिळाले आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हतबल असून सर्वांनी काळजी घ्या अशी पोस्ट केली आहे.
शरद बुट्टे पाटील यांनी आयुष प्रसाद यान मेसेज करून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे सांगत रुग्णांनी इंजेक्शन मिळत नसल्याने मृत्यू पत्करायचा का? असा प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एक पार जरी केले. ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालयांना इंजेक्शन मिळाले नाही. त्या पत्रात अधिकाऱ्यांचे नंबर दिले आहेत ते सुद्धा हतबल आहेत. याला उत्तर देताना आयुष प्रसाद म्हणाले. मी निराश झालो आहे. माझ्या हातात काही नाही. काल पासून भरपूर लोकांना सहकार्य केला आहे पण.. असे उत्तर आयुष प्रसाद यांनी दिले त्यानंतर शरद बुट्टे पाटील यांनी हा प्रश्न कसा सुटणार अशी विचारणा केल्यावर त्यांनी आता माझ्या कडे काही नसल्याचे सांगत आपण हतबल असल्याचे सांगितले.