जेंव्हा ४० वर्षांचे जिन्ना यांची प्रेमकहाणी संपूर्ण देशभरात गाजते…

when-40-year-old-jinnahs-love-story-spreads-all-over-the-country
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वर्ष १९१६ च्या उन्हाळ्यात जिन्ना यांना, यांचे मित्र दिनशॉ पेतीत यांनी मुंबईच्या गर्मी पासून दूर दार्जिलिंग येण्याचे निमंत्रण दिले होते. तिथेच जिन्ना यांची भेट सर दिनशॉ यांची १६ मुलगी रती सोबत झाली. जिचा समावेश त्याकाळात मुंबई मधील सर्वात सुंदर मुलींमध्ये होत असायचा. तीक्ष्ण बुद्धीच्या रतीला जेवढी आवड रोमानी कवितांमध्ये होती तेवढीच राजनीती मध्ये देखील होती.

त्याकाळच्या भारतीय राजकारणात जिन्ना यांचे वेगळे स्थान होते.

अर्थात त्यावेळी त्यांचे वय ४० वर्षाच्या आसपास होते परंतु बर्फाने झाकलेले शांत पर्वत व रतीच्या सौंदर्याने अशी काही किमया केली की, जिन्ना हे रतीच्या प्रेमपाशात पुरते अडकले होते. दार्जिलिंग मध्ये असतांना. एकदा रात्री जेवणानंतर जिन्ना यांनी दिनशॉ यांना प्रश्न केला की, दोन धर्मांमधील विवाहाविषयी तुमचे काय म्हणणे आहे?

रतीच्या वडिलांनी त्वरित उत्तर दिले की, त्याने राष्ट्रीय एकता निर्माण व्हायला मदत होईल. हे उत्तर ऐकून जिनांनी एक क्षण पण न दवडता आपल्या मित्राला म्हटले की, ते त्यांच्या मुलीशी त्यांना लग्न करण्याची इच्छा आहे. मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर पुस्तक लिहणाऱ्या शिला रेड्डी म्हणतात की, या लग्नाच्या मागणीने जिन्ना यांचे स्नेही सर दिनशॉ यांना खूप राग आला होता. आणि त्यांनी त्याचवेळी जिन्ना यांना घरातून बाहेर काढले. जिन्ना यांनी खूप प्रयत्न करूनही ते दिनशॉ यांना मनवू शकले नाहीत. दोन धर्मांमधील मैत्रीचा त्यांचा फॉर्मुला पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरला. यानंतर दिनशॉ यांनी कधीच जिन्ना यांच्याशी वार्ता केली नाही आणि रती वर देखील निर्बंध आणले.

जिन्ना एक प्रथितयश वकील होते, क्वचितच ते केसेस हरत असत. दिनशॉ जेवढे जिद्दी होते त्यापेक्षा जिद्दी हे जोडपं होते. दोघांनी खूप धैर्याने, शांततेत २ वर्षे रतीच्या १८ वर्ष वय होण्याची वाट बघितली.

जिन्नांचे चरित्रकार प्रोफेसर मुहाजिद यांनी लिहलंय कि मोजक्याच वस्तूंनीशी रतीने २० फेब्रुवारी १९१८ रोजी आपले घर सोडले. जिन्ना रतीला जामा मस्जिद येथे घेऊन गेले जिथे रतीने धर्मांतर केले व १९ एप्रिल १९१८ रोजी रती व जिन्ना यांचा निकाह झाला.

रती जिन्ना यांच्यावर पुस्तक लिहणाऱ्या राजी हैदर लिहतात जिन्ना इंपिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल मध्ये मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करत होते. जर त्यांनी सिविल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न केले असते तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळे त्यांनी इस्लामिक पद्धतीने लग्न करायचा निर्णय घेतला.

२४ वर्ष लहान मुलीशी जिन्ना यांनी केलेले लग्न त्याकाळात देशातला चर्चेचा विषय बनला होता. जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांच्या “द स्कोप ऑफ हॅप्पीनेस” मध्ये याचा उल्लेख आढळतो. त्या लिहतात त्याकाळात असे काही होणे क्रांतिकारी होते. त्या म्हणतात की, रती आणि त्या एकच वयाच्या होत्या व चांगल्या मैत्रीणी होत्या परंतु दोघांचे पालनपोषण वेगवेगळ्या वातावरणात झालेलं. जिन्ना त्याकाळातले उभरते राष्ट्रीय पुढारी होते तसेच ते एक नामांकित वकीलही होते याच गोष्टी रती यांना प्रभावित करत होत्या.

एकदा मुंबईच्या गव्हर्नर विंलिंग्ट्न ने जिन्ना व रती यांना स्नेहभोजनासाठी बोलावले होते. रती यांनी लो कट पोशाख परिधान केलेला पाहून विंलिंग्ट्न ने रतीसाठी शाल मागवली तेव्हा रतीला शाल पाहिजे असेल तेव्हा ती स्वतःहून मागून घेईल अशी सडेतोड प्रतिक्रिया देऊन जिन्ना तिथून निघून आले.

हळू हळू जिन्ना यांची व्यस्तता व दोघांच्या वयातील फरक दोघांमध्ये दुरावा आणणारे ठरले. हाजी हैदर यांच्या आकलनानुसार राजनीतिक कारणाने सुद्धा त्यांच्यातील दुरावा वाढत गेला . १९२६ येता येता जिन्ना यांचे भारतीय राजकारणात ते स्थान नाही राहिले जे १९१६ ला होते. नंतर रती आजारी राहायला लागली.

२० फेब्रुवारी १९२९ रोजी वयाच्या केवळ २९ व्या वर्षी रती जिन्ना यांचे निधन झाले. जिन्ना यांचे सचिव राहिलेले एम के छागला जे कि नंतर भारताचे विदेश मंत्री झाले ते ‘रोझेस इन डिसेंबर’ या आपल्या आत्मचरित्रात लिहितात कि, जेव्हा रती यांच्या पार्थिव शरीराचे दफन करण्याची वेळ होती तेव्हा त्यावर रतीच्या जवळच्या व्यक्तीला माती टाकण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा जिन्ना यांना अश्रू अनावर होऊन ते हुमसून हुमसून रडू लागले… त्यांचे ते रूप सार्वजनिक जीवनात क्वचितच कोणी बघितले असेल.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *