वाझे NIAला काय सांगितल याची चिंता त्यांच्या मालकांना
नागपूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे. सचिन वाझेंवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली आहे. महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली आहे. वाझेंचे मालक याच चिंतेत आहे की तो NIA ला काय सांगेल. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
नवाब मलिक का चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग प्रकरणात अनेकांचे बिंग फुटणार आहे. वाझेंचे मालक याच चिंतेत आहे की तो NIAला काय सांगेल. यामुळे कॉंग्रेससह तिन्ही पक्ष अस्वस्थ आहे. कारण वाझेंचे हेच खरे मालक आहे. यांनी वाझेंकडून काय कामे करून घेतली म्हणून शंका कुशंका काढत आहेत असा आरोप सुद्धा फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले, फोन टॅपिंगचा अहवाल नवाब मलिक यांनी फोडला. माझा सवाल हा आहे की पोलिसांची बदनामी कोणी केली? सिंडीकेट राज कुणी चालविले? बदल्या कुणी केल्या? वाझेंची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली की नाव केले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
फडणवीस पुढे म्हणाले, सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार, त्यांना काय समजते? हे रोज काहीही बोलतात. आमचे राम कदम आहेत. ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर देण्याची गरज नाही.