पवारांसोबत काय चर्चा झाली? गृहमंत्री म्हणाले

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

तब्बल दीड तास चर्चा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक भरलेले वाहन सापडले होते. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. यानंतर गृहमंत्री बदलण्याबाबत चर्चा होत आहे. नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  

या सर्व प्रकरणात विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी बोलन टाळले.  शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात तब्बल दीड तास चर्चा चालली. नागपूर मध्ये मिहान प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख म्हणाले,

“विदर्भात, नागपूर मध्ये मिहान प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यात आंतरराष्ट्रीय कंपन्या येण्याच्या तयारीत आहे. त्या विदर्भात आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी पवार साहेबान सोबत चर्चा केली. तसेच सध्या मुंबईत घडत असलेल्या घडामोडीची माहिती पवार साहेबाना दिली.मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरणाची माहिती त्यांना दिली अस देशमुख यांनी सांगितलं.

NIA आणि ATS तपास करत आहेत. त्यांना लागणारी मदत राज्यसरकार मदत करत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्याची चौकशी पूर्ण होत नाही त्यावर बोलन योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *