रेमडेसिवीर औषधाची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतः कडे ठेवण्याचे प्रयोजन काय? – राज ठाकरे

दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी रेमडेसिवीर आणि कोरोनाशी संबंधित इतर आवश्यक, औषधं आणि साहित्य ह्यांची खरेदी आणि वितरण करण्याचे अधिकार राज्यांना द्यावेत अशी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
“संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहे. काल तर देशात रुग्णसंख्येने ३ लाखाचा आकडा पार केला. मृत्यूचे आकडे सुद्धा चिंताजनक आहे. प्रेताच्या रांगा लागल्याचे गुजरात आणि इतर राज्यात पाहिले. ती मनातून जात नाही. ही वेळ खरच भीषण आहे. मुळीच राजकारणाची नाही. आता देशाला एकत्र येवून परिस्थितीचा मुकाबला करण्याची वेळ आहे. अस राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे
“आरोग्य सेवेची यंत्रणा पूर्णपणे कोसळली आहे. कोरोना बाबतच्या चाचण्या पुरेशा गतीने होत नाही. रुग्णालयात पुरेशा खाटा नाही, उपचारासाठी पुरेसे रेमडेसिविर आणि इतर साधन उपलब्ध नाही. अत्यंत गरजेचा ऑक्सिजन पुरेसा पुरवठाही होत नाही. लसीकरण आपण खुले केले आहे परंतु ते योग्य संख्येने पुरवठा होईल की नाही याची खात्री नाही. भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट १०० वर्षात आल नसावं. हे आव्हान म्हणून फार मोठे आहे अशी नमूद केले आहे.
अशातच बातमी वाचली की रेमडेसिविर सारख्या कोरोनावरील अत्यंत महत्वाच्या अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार करणार आहे. हे वाचून मला धक्काच बसला. आपण देशाला उद्देश करून केलेलं भाषण मी ते काळजीपूर्वक ऐकले. आपण राज्यांना काही सूचना केल्या आहेत. आणि ह्या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय पावले उचलावी आणि याच मार्गदर्शन केले. त्यावर मग आता रेमडेसिवीर औषधाची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.