जर देशमुख क्वारंटाईन होते? मग हे कोण?
मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपा नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्याला उत्तर देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली. तसेच फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख यांना कोरोना झाला होता. ६ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख हे नागपूर मधील एका हॉस्पिटल मध्ये भरती होते. त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत ते घरातच विलगीकरणात होते. मग कशाच्या आधारे देशमुख यांनी सचिन वाझे यांना वसुलीचे आदेश दिले अस सिंग सांगतात? असा सवाल करत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहे.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या १५ मार्च रोजीच्या पत्रकार परीषदेच ट्वीट रिट्वीट करत पवारांना सवाल केला.
“१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधींशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m
शरद पवार यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळले
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहे. आज शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंह यांच्या पत्राची चिरफाड केली.
फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख यांना कोरोना झाला होता. ६ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख हे नागपूर मधील एका हॉस्पिटल मध्ये भरती होते. त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत ते घरातच विलगीकरणात होते. मग कशाच्या आधारे देशमुख यांनी सचिन वाझे यांना वसुलीचे आदेश दिले अस सिंग सांगतात? असा सवाल करत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहे.
परमबीर सिंह यांच्या प्रकरणावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख कुठ होते हे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात देशमुख हॉस्पिटल मध्ये होते असे सांगत कागदपत्रे समोर ठेवली. मुख्य केस ही मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन ठेवलेले होते. मात्र परमबीर सिंह यांनी केसचे लक्ष दुसरीकडे वळवून घेण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटा आरोप करणारे पत्र लिहिले असल्याचे पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची सरकार कुठलीही अडचण होणार नाही. गंभीर प्रकरण असल्याचे कालच सांगितले होते. मात्र काल रात्री संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यात अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही.