‘त्या’ अभिनेत्र्यांचं शेवटी काय होतं…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अवघ्या ५३ वर्षाच्या परवीन बाॅबी चा मृतदेह तिच्याच घरात बेवारस आढळला. शेवटी कोणालाच तिच्या विषयी काहीही माहिती नाही. अशा अवस्थेत दिवस कंठून अखेर मरण पावलेली ही अभिनेत्री एकेकाळी अतिशय यशस्वी होती. दिवार, चरित्र, कालिया यांसारख्या सिनेमातल्या भूमिका आणि प्रत्यक्षातली बिनधास्त जीवन शैली यामुळे बॉलिवुडमधल्या सती सावित्री नायीकांच मिथक तिने मोडून टाकलं होतं. रुपेरी पडद्यावर नव्हे तर समाजातही त्यामुळे स्त्री प्रतिमा बदलली होती. परवीन यांना बदलत्या भारतातल्या तरुण सुंदरीचं प्रतीक म्हणून ‘टाइम्स’ या अमेरिकन मासिकाने मुखपृष्ठावर तिचा फोटो छापला होता. तिनं गायलेली गाणी तिच्या खास लकबी आणि नाजूक-साजूक नखरे यांविषयी लेखात लिहिलं गेलं. परंतु अशा बाबतीत सिनेमा आणि आयुष्य यांच्यात संपूर्ण फारकत करणं धोक्याचं असतं. बाहेरुन जसं दिसतं किंवा प्रेक्षक प्रसार माध्यम वाले आणि मध्यमवर्गीय लोक यांना वाटतं त्यापेक्षा अनेक नट्यांच आयुष्य वेगळं असतं. सुरय्या, मीनाकुमारी, मधुबाला, परवीन बाॅबी, झिनत अमान आणि रेखा किंवा स्मिता पाटील या ६०, ७० आणि ८० च्या दशकात चर्चेत असलेल्या नट्यांचे उदाहरण घेतलं तर, त्यांची आयुष्य आपल्याला कदाचित अनैतिक आणि स्वैराचारी वाटतील. परंतु मध्यमवर्गीय माणसांना जेवढं दिसत होतं तेवढं त्यांचं आयुष्य नव्हतं.

व्यावसायिक चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्री म्हणजे स्वावलंबी स्त्रियांची पहिली यशस्वी पिढी होती. परंतु दुर्दैवाने कस्तुरीमृगाप्रमाणेच या विलक्षण स्त्रियांना आपलं सामर्थ्य उमगलं नाही. त्या पुरुषांवर अवलंबून राहिल्या. संपत्ती आणि यश यांचं प्रकाशमान वलय त्यांच्याभोवती होतं पण त्यांच्या मनाचा दुबळेपणामुळे त्यांचा आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण करणारे लोकही आसपास होते. या बहुतेक सर्वांच्या शरीराचा आणि कमाईचा आई,बाप,भाऊ,नवरा,मुलगा किंवा प्रियकर यांनी पुरेपूर उपभोग घेतला. मात्र भावनात्मक आधार किंवा टिकाऊ प्रेम शोधण्याचा प्रयत्न त्या नेहमी फसवल्या गेल्या होत्या आणि तरीही त्या बायकांपेक्षा पुरुषांवर जास्त विश्वास टाकत आल्या.

१९८३ मध्ये जेव्हा परवीन बॉबी कुणालाही काहीही न सांगता गायब झाली होती. ८० च्या दशकापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण १९८३ मध्ये परवीन यांना नेमके काय झाले होते कुणास ठाऊक, पण ती कोणालाही न सांगता चित्रपट आणि इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेतून गायब झाली होती. ती अशी अचानक कुठे आणि का गेली हे कोणालाच माहिती नव्हते. त्यावेळी अशा बर्‍याच अफवाही समोर आल्या की, परवीन देखील इतर हिरोईन्स प्रमाणे अंडरवर्ल्डच्या प्रकरणात अडकलेली असणार.  ती अनेक वर्षांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अनुपस्थितीतच तिचे बरेच चित्रपट प्रदर्शितही झाले होते.

नंतर उघडकीस आले की, परवीन १९८३ मध्ये भारत सोडून अध्यात्माच्या शोधात आपल्या मित्रांसह अमेरिकेत गेली होती. तेंव्हाही ती फिल्म इंडस्ट्री मध्ये यशाच्या शिखरावर होती. त्यावेळी तिने अनेक देशांचा प्रवास केला. अशातच १९८४ मध्ये जेंव्हा परवीनला न्यूयॉर्कमधील एका विमानतळावर कागदपत्रां संधर्भात थांबविण्यात आले होते तेव्हा तिच्या वागण्यात बराच विचित्र बदल जाणवला होता. त्यानंतर परवीनला अनेक दिवस मानसिक रूग्ण असलेल्या रुग्णालयात ठेवले होते. त्यानंतर परवीन १९८९ मध्ये मुंबईला परतली. पण तोपर्यंत ती पूर्णपणे बदलली होती. तिचे वजन लक्षणीयरित्या वाढले होते. असे म्हणतात की, परवीनला क्रिझोफ्रेनिया हा आजार होता. म्हणजेच मानसिकरित्या कमजोर असणे, विचित्र हालचाली करणे, स्मृतिभ्रंश होणे इत्यादी लक्षणें परवीन बाॅबीमध्ये ठळकपणे होती. या मानसिक आजाराचा बळी ती कधी आणि कशी झाली हे आजपर्यंत कुणालाही माहित नाही. परंतु असे म्हटले जाते की संपत्ती आणि किर्ती असूनही परवीन खाजगी आयुष्यात खूप एकटी होती आणि बहुधा हेच तिच्या मानसिक आजाराचे कारण होते. तथापि, परवीनने हे कधीही स्वीकारले नाही आणि तिने चित्रपटसृष्टीवर आरोप केले की या उद्योगाशी संबंधित लोक तिच्याशी कट रचत आहेत आणि तिची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय स्त्रिया समाजसेविका किंवा सिने पत्रकार स्त्रिया यांनी ही त्यांची तडफड आणि भावनांकडे कधी सहानुभूतीने पाहीलच नाही. अनेक पुरुष आणि त्यांना फसवलं होतं समवयस्क बायका त्यांचा तिरस्कार करायच्या. त्यामुळे वय झाल्यावर प्रिया राजवंशी, सुरैया, मीनाकुमारी आणि परवीन बाॅबी अभिनेत्री अतिशय एकाकी आणि दुःखी झाल्या होत्या. त्यांना मृत्यू ही एकटी पण मी बहुदा औषध पाण्याविना भयाण घाणेरड्या घरांमध्ये आला हा काही निव्वळ योगायोग नव्हे. त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीचा तपशील माहित झाल्यावर मात्र नातलग मित्र म्हणवणारे आपला हिस्सा मागण्याकरिता कुठून कुठून येऊन टपकत होते.

अजूनही बॉलीवुडचं हे स्वरूप विचित्र व लाजिरवाणं झाली आणि आत्मकेंद्रीत आहे. असं नाही तर एकुणातच ग्लॅमर आणि पैसा यांचा गुलाम बनलेलं पुरुष वर्चस्वाने घेतलेलं सगळं सिनेजगतच जगत असं आहे. हाच हॉलीवूड आणि बॉलीवूड चा खरा चेहरा आहे. आपल्या मनातली निराशा आणि भीती यातून बाहेर पडण्यासाठी अमली पदार्थ, दारू, अध्यात्म यातला अतिरेक, यात झोके घेणाऱ्या परवीन बाॅबी किंवा झीनत अमान या एका प्रकारे भारताच्या मध्यमवर्गीय संस्कृतीला त्यांच्या पिढीने दिलेल्या आव्हानाशी थेट नातं सांगत होत्या. त्या विद्रोहाचं प्रतीकही मानल्या जात होत्या. त्या नट्यांचे युग संपून आता कितीतरी दशकं लोटली आहेत तरीही परंपरा आणि आधुनिकता या विषयात आजही बॉलीवूड द्विधामानसिकतेचा बळी ठरत आहे. एकीकडे पाश्चिमात्य फॅशनचा आणि राहणीमानाचा  स्वीकार करणे दुसरीकडे अंधश्रद्धेपोटी गुरुंकडे जाणे, गंडेदोरे, ताईत, चमत्कारी अंगठ्या वगैरे. एकीकडे पारंपारिक पद्धतीने लग्नाची इच्छा आणि दुसरीकडे सर्व प्रकारचा अनाचार. बाहेरून घराणेशाही छापाची लाचार बुद्धीने झाकलेले बॉलिवुडची मर्म संस्कृती आजही थोडीशी देखील बदललेली नाही आणि बदलण्याची शक्यताही दिसत नाही.

परवीन बाॅबी ची शोकांतिका हीच होती की भाषा पार्श्वभूमी आणि संस्कार कुठल्याच बाबतीतला बॉलीवूडचं दुटप्पी वास्तव ती पूर्णपणे समजून घेऊ शकली नाही. खरे आयुष्यात आणि सिनेमात एकाच तत्वांनं जगायच्या प्रयत्नात द्विधामानसिकतेची बळी ठरली. कदाचित शेवटाकडे जाताना तिला हे सिनेजगत हा एक चमत्कार वाटत असेल. कधी त्यातून सुटण्यासाठी धडपडत असे तर कधी तिथं परत जाण्यासाठी. बॉलीवूड ची दुनिया ही मनानं आजारी असलेल्या वय झालेल्या अभिनेत्रीला स्वतःसाठी एक आश्वासक भूमिका एक सन्मानाची जागा शोधता यावी इतकी कधीच स्थिर नसते. या जगात काही टिकाऊ असेलच तर ते आहे केवळ बॉलिवुडच्या सिनेजगताचं मृगजळ. ही वस्तुस्थिती आहे की बॉलिवूड ना कुणाचं घर बनू शकतं ना कुणाचं घरटं!


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *