नक्की भाजपाला खुपतंय काय ? ; सुधांशू त्रिवेदी यांनी माफी मागावी – अमोल कोल्हे

अमोल कोल्हे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी खवळले असून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद निवळतोय तोच त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं.

त्यांच्या या विधानाचा अभिनेते ताथा खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘कधी भाजपाचे प्रवक्ते तर कधी महामहिम राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करत आहे.

नक्की भाजपाला खुपतंय काय ? असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित करत याचा निषेध व्यक्त केला.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशू त्रिवेदी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं. भाजपानं आपली शिवाजी महाराजांविषयी नेमकी भूमिका काय आहे ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी.

महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही अमोल कोल्हे यांनी केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *