पुण्यात काय सुरु काय बंद?

पुणे: आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानुसार उद्यापासून पुढील सात दिवस बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
पुण्यात काय सुरु काय बंद?
- सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील, पार्सल सेवा सुरु राहील.
- पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील.
- संध्याकाळी संचारबंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
- मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
- धार्मिक स्थळं ७ दिवसांसाठी बंद
- PMPML बससेवा ७ दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
- मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील.
- आठवडे बाजारही बंद
- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
- संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- दिवसभर जमावबंदी
- जिम सुरु राहणार
- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
- शाळा महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद
मायक्रो कंटेंटमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याआधी आज दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचंही समजतंय. आज बैठकीत ठरवले गेलेले निर्बंध उद्यापासून लागू करण्यात आले आहेत.