सुप्रिया सुळेंकडून आव्हाडांच्या अटकेचं स्वागत ; म्हणाल्या…

सुप्रिया सुळे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

ठाण्यातल्या विवीयाना मॉलमधल्या चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आलीये. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय.

आव्हाडांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी या अटकेचं स्वागत केलंय. ‘एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते, अशी मार्मिक प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंनी दिलीये.

त्या म्हणाल्या की, “एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं दाखवत असेल आणि दुसरी व्यक्ती त्याविरोधात आपल्या वेदना मांडत असेल, यामुळे जर आव्हाडांना अटक होत असेल तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते. त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरुंगात जावं लागलं तरी चालेल.

कारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड तुरुंगात जात असतील, तर जितेंद्र आव्हाडांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजुने आहात? तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर तसं स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू’.

त्या म्हणाल्या की, जो चूक करतो, त्याला पूर्णपणे माफी मिळते आणि जो एखादं आंदोलन करतो, त्याला शिक्षा दिली जाते. यातून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. जितेंद्र आव्हाड हे एक लढवय्ये नेते आहेत.

त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पोलीस ठाण्यात गेल्यावर कळालं की, पोलिसांवर वरून दबाव येतोय. पण आता वरून दबाव येतोय म्हणजे कुठून दबाव येतोय? याचं उत्तर माझ्याकडे नाही’, असंही सुळे म्हणाल्या.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *