|

अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारून स्वागत करा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्त्या वरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले होते. या वादात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा-विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. येथील जनतेने अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारून स्वागत केले पाहिजे अशी टीका त्यांनी ट्वीट वरून केली आहे.

निलेश राणे म्हणाले, राज्यपालांकडून विधान परिषदेचे  १२ आमदार जाहीर करत नाहीत. तो पर्यंत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना करू असे म्हणाले होते. हा मराठवाडा–विदर्भ जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले तर त्यांचे स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केले पाहिजे. असेही त्यांनी ट्वीट करून टिका केली. तसेच १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबध असा सुद्धा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.            

वैधानिक विकास महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त १२ आमदार नियुक्ती यावर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यावेळी पवार यांनी जो पर्यत १२ आमदार नियुक्त होत नाही तो पर्यंत वैधानिक विकास मंडळाची नियुक्ती करण्यात येणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *