दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा

नवी दिल्ली: दिल्लीतील कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली येथे विकेंड कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री-उपराज्यपाल यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज विकेंड कर्फ्युची घोषणा केली आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता दिल्ली सरकारने आजपासून नाईट कर्फ्यू लागू केला जो ३० एप्रिल पर्यंत लागू राहील रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.
सद्याच्या परीस्थित दिल्लीमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाची १७ हजार २८२ प्रकरणे नोंदवली गेली आणि संक्रमणामुळे १०४ लोक मरण पावले.
महाराष्ट्रा नंतर विकेंड कर्फ्यूची घोषणा दिल्लीत करण्यात आली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात तर आता १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आज पासून हा लॉकडाऊन असणार आहे.