त्या भेटीत काय झाल हे कळायला हवं-कॉंग्रेस
मुंबई: गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची अहमदाबाद येथे गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. याबातमी नंतर देशातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरु आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तर भाजप कडून यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
“जर देशाचे गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्या सोबत भेट घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेणे नागरिकांचा हक्क असल्याचे कॉंग्रसचे नेते संदीप दिक्षित यांनी सांगितले. तसेच दोन्ही नेत्यात काय बातचीत झाली हे कळायला हवे असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.
अमित शहा, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीची वृत्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने फेटाळून लावले आहे. “गुजरात मधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसापासून ट्वीटर वर अफवा पसरविण्यात येत आहे. अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच भाजप भेटीची अफवा पसरवत असल्याचा आरोप सुद्धा मलिक यांनी केला. शरद पवार-अमित शहा यांच्यात बैठक झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले.
तर याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, सर्व गोष्टी सार्वजनिक करता येत नसल्याचे सांगत भेट झाल्याचे नाकारले नाही.