Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाराज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल -...

राज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल – रोहित पवार

पुणे: कोरोनाच्या काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागत आहे. आज ही स्थिती हाताळणारी प्रत्येक सरकारी यंत्रणा मग ते पोलीस असोत की आरोग्य कर्मचारी असोत की अत्यावश्यक सेवा पुरवणारी यंत्रणा  ही प्रत्येक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येक माणूस पूर्ण क्षमतेने या परिस्थितीला सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे. आज राज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल आणि या संकटावर मात करावी लागेल असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

रोहित पवार यांनी याबाबत सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून कोरोनाच्या सद्यस्थिती वर भाष्य करत विरोधकांनी राजकारण करू नये असे सांगितले आहे. ते म्हणाले,

विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. हे संकट वेगळं आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. मानवतेच्या मुळावर उठलेल्या या संकटाचा सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करून  संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश आपल्याला देता येईल. त्याची हीच वेळ आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करुयात आणि कोरोनाच्या संकटाला थोपवूयात! असे सुद्धा पवार यांनी सांगितले.

भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं हा विरोधकांचा दावा फोल

२०२१ हे वर्ष तरी व्यवस्थित जाईल अशी सर्वांची भावना होती मात्र परत यावर्षी रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि आता ती इतकी वाढली की राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली.

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं.

इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्चितच चिंताजनक आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे तिथं रुग्णांची संख्याही अधिक असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास ५०% रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत.

वरील राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो.

कोरोना वरून राजकारण करणं थांबवत नाहीयेत हे दुर्दैवी

आज जेंव्हा  भाजपच्या नेत्यांना मीडियाशी बोलतांना पाहतो तेंव्हा ते महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीयेत हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत.

पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र

ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि काही रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय, मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र आहे, रुग्णवाढीचा वेगही अधिक आहे.

लसीकरणात महाराष्ट्र देशात आघाडीवर

कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने १ कोटी ५ लाख २९ हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस ९५ लाख २० हजार ७२५ लोकांना तर दुसरा डोस १० लाख ८ हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता ६ लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. 

 उत्तरप्रदेश, बिहारची परिस्थिती वाईट

उत्तरप्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या.

 रेमेडेसिवीर औषधाची निर्यात रोखली नाही

जगभरात कोरोनाची एका नंतर दुसरी लाट येते हे अनुभव सर्वांना होता. त्याप्रमाणे ती भारतातही येणार हे नक्की होतं मात्र तरीही केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात जवळपास १०० देशांमध्ये ११ लाख रेमेडेसिवीर औषधाची निर्यात केली. वास्तविक आपल्यासाठी आवश्यक तेवढा साठा झाल्यानंतरच निर्यात करणं अपेक्षित होतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments