वाझेंची ‘ती’ मर्सिडीज भाजप नेत्याची

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर वाहनात सापडले स्फोटके आणि वाहन मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच रोज नवीन खुलासे बाहेर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे हे वापरत असलेली मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे. त्यात ५ लाख, पैसे मोजण्याची मशीन आदी सापडले होते.

आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेली मर्सिडीज सोबत भाजप नेत्याचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.

यामुळे या सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची चिन्हे आहेत. मनसुख हिरेन याचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी त्यांनी मर्सिडीज मधून प्रवास केला होता. त्याच मर्सिडीज कार सोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो आहे. शेळके यांचे १० ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतचे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. त्यात त्यांनी नियुक्तीपत्र सुद्धा दिले आहे. आता या बद्दल भाजपने खुलासा करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

या कारचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत, त्यांनी जानेवारी महिन्यात ओनलाईन व्रिक्री केली होती. त्यामुळे ही कार कोणी घेतली या बद्दल आपल्याला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *