वारणा साखर कारखाण्यावर आलेली पाणीबाणी…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पाण्याचे महत्व उमजायला फार लांब कुठे जायची गरज नाही. भारतातील शेती व्यवसायाचे भाग्य चक्र पाण्याच्या थेंबा भोवती सदैव फिरते असते. शेती व्यवसाय हा एक जुगार बनला आहे कारण पाण्याची निश्चिती कोणी देऊ शकत नाही. पाऊस वेळेवर पडला तर त्याचा फायदा आणि तो नाही पडला तर सगळेच मुसळ केरात. पाऊस जास्त पडला तर पिके उध्वस्त. पाऊस अवेळी पडला तर पिकांवर कीड. पाण्याचा भरवसा नाही त्यामुळे शेतीचा भरवसा नाही आणि अशा प्रकारची भारतीय शेती आपले ७२ टक्के लोकं करतात. अन्नाशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही आणि अन्न पैदा करणारा शेतकरी व्यवसाय पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणीशिवाय सर्वार्थाने सर्वच व्यर्थ!

शेतकर्‍यांच्या शेतात पाणी असेल, तर त्याच्या हत्याराला पाणी असेल आणि तरच त्याच्या अंगात पाणी दिसेल! या तीन पाण्यापैकी एक जरी पाणी चुकले तर उरलेले पाणी कुचकामी. शेतकरी जीवनातील ही म्हण वारणा साखर कारखान्यातील या शेतकऱ्यांना चांगलीच लागू पडते. सहकारी तत्त्वावर वारणेकाठी साखर कारखाना उभारणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे त्यांच्या आत्मचरित्रात वारणेच्या काठी साखर कारखाना उभा करताना कारखाना परिसराची पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखाना लि. ही संस्था वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाची मातृसंस्था आहे.  वारणा सहकार समूह ज्यांनी उभारला ते म्हणजे तात्यासाहेब कोरे यांनी. वारणा साखर कारखाना आणि दुध समूह जो आज यशाच्या शिखरावर आहे. त्यांचे श्रेय तात्यासाहेब आणि तत्कालीन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जाते. वारणा काठचा साखर कारखाना उभा करताना पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी, तात्यासाहेब कोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. विहिरी खणणं, बंधारे बांधणं, तलाव उपसा हे असे सगळे प्रयत्न त्यांनीही केले होते. त्या प्रयत्नापेक्षाही त्यांनी काहीतरी वेगळं केलं होतं.

१९६८ पासून पाण्याची टंचाईची वर्ष सुरू झाली होती. पाऊस आला नी हूल दाखवून जो पळाला तो पळालाच. अवर्षणामुळे सभासदांच्या उसाची साफ चिपाडं झाली. सभासदांचा जो काही ऊस कारखान्यात येत होता त्याचं गाळप चाललं होतं. कारखान्याला वारणा नदीतून पाणीपुरवठा होत असायचा. पण वारणा नदी १९६९ साली आटली. पाणीपुरवठा बंद झाला. तशी वारणा नदी काही बारमाही प्रवाही नदी नव्हती. परंतु ती मार्च महिन्यापर्यंत वारणा कारखान्याला पाणीपुरवठा करू शकत असायची. पण त्या वर्षी डिसेंबरमध्येच पाणीपुरवठा बंद झाला. पाऊसच पडला नव्हता, शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी कसे द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला.

सभासदांचा ऊस गाळप करून घेणे आवश्यक होतं. ऊस गाळपासाठी खूप पाणी लागते, आता हे पाणी आणायचं कुठून? म्हणून शासनाकडून पंचगंगा नदी मधील पाणी कारखाना गाळपासाठी घेण्याविषयी परवानगी मिळवली. हे पाणी चक्क टॅंकरने कारखान्यापर्यंत आणले जायचे. ही टॅंकर्स ट्रॅक्सवर चढवायचे व ट्रस्टच्या खेपाकरून कारखान्याला पाणीपुरवठा करायचा हे काम म्हणजे एक मोठं दिव्य होतं. आणि ते काम दोन दिवस नव्हे तर तीन-साडेतीन महिने चालणार होतं. पण कारखान्याने मोठ्या जिद्दीने या हि संकटाशी मुकाबला केला. ट्रॅक्टर ची वाहतूक अजिंठा ट्रान्सपोर्टने मोठ्या हिमतीने केली होती. त्यावर्षी गळीताचे क्षेत्र पुष्कळ मोठे होते परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे संपूर्ण गाळप करणे शक्य नव्हते. म्हणून परिसरातील ऊस दुसऱ्या कारखान्यांच्या कडे गाळपासाठी पाठवावा लागला होता.

१९६९ ते ७० सालचा हंगाम म्हणजे १९६८ च्या हंगामाचीच पुनरावृत्ती होती. १९६९-७० च्या गळीत हंगामात निसर्गाची पुन: अवकृपा झाली. पिकाचे अत्यंत नुकसान झाले, साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यावेळी कोल्हापूर जवळच्या केर्ली गावचे प्रगतशील सधन शेतकरी श्रीपतराव बाबुराव पाटील यांनी या कारखान्यासाठी आपल्या जागेत मोटार पंपाने पाणी खेचून सतत पाणी पुरवठा करण्यासाठी बहुमोल सहाय्य दिले. सलग दोन वर्ष त्यांनी पाणी विनामूल्य दिले एक पैसाही अपेक्षीला नाही. या त्यांच्या बहुमोल सहा याबद्दल कारखान्यातर्फे ७ फेब्रुवारी १९७० रोजी त्यांचा माननीय रत्नाप्पाण्णांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन त्यांना अँबेसिडर गाडी सप्रेम भेट देण्यात आली होती.

 टँकरने आणलेल्या या पाण्याची किंमत भरमसाठ होती. १५ लाख रुपये खर्च करून अवघ्या दहा महिन्यात, १९७०-७१ च्या हंगामात कारखान्यात पंचगंगेचे पाणी आणले. पण यामुळे पाण्याची समस्या सुटली असे नाही. कारखाना परिसर म्हणजे वारणा खोरे या वारणा खोऱ्याचा विकास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावरील धरणात शिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे कारखान्याने अद्भुत गतीने रोमहर्षक रीतीने आणि भयचकित परिस्थितीत पूर्ण केलेला शिगाव येथील धरण सदृश्य बंधारा. कारखान्याने शासनाला प्रेरित करून कोडोली येथे वारणा नदीच्या प्रवाहाला दहा फुटी बंधारा घालून परिसरातील शेतकऱ्यांची ऊसक्षेत्र वाढवले. आणि त्याच बरोबर इतर नित्य उपयोगी शेती उत्पन्नही वाढविण्यास सहकार्य केले. त्यानंतर तांदूळ वाडी येथे नदीला बारा फुटी बंधारा घालून अशाच प्रकारे पाणी साठा वाढवला आणि ऊस व शेती उत्पन्न वाढविण्याच्या उपक्रमांना चालना दिली. खोची येथेही वारणेला वीस फुटी बंधारा घालून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.

१९७३ मध्ये कोडोली भिंतीची उंची आणखी १० फुटांनी वाढली म्हणजे आता कोडोली बंधारा वीस फुटी झाला. याबाबतीत कारखान्याने त्यापूर्वी पाच ते सात वर्ष प्रयत्न चालवला होता. या भिंती वाढवण्याच्या कामाचा आधी सर्व खर्च कारखान्याने केला. नंतर शासनाकडून या खर्चाची रक्कम हळूहळू दिली गेली. शासनाने पैसे दुष्काळी कार्यासाठी अन्यत्र जलदीने जात असल्याने शासनाच्या खांद्यास खांदा लावून हे काम कारखान्याने केले. शिगावचा धरणवजा बंधारा, ही वारणा साखर कारखान्याचे विलक्षण उत्कृष्ट कार्यक्षमतेचे उदाहरण आहे.

हे पंचवीस फुटी धरण बांधल्यामुळे १५० दशलक्ष घनफूट पाणी साठवून त्यामुळे १८०० एकच शेतीला पाणीपुरवठा होण्याचा अंदाज करण्यात आला. शिगाव भादोले या परिसरातील कारखाना भागधारकांचे शेतीला मार्च एप्रिल मे व जून हे चार महिने मुळीही पाणी मिळत नाही. कारण मारण्याचे पाणी आठवण जात असते यावर उपाय म्हणजे शिकावे ते पंचवीस फुटी बंधारा उभा करणे. या प्रकल्पाला एकूण बारा लक्ष रुपये लागणार होते. साधारणपणे अशा कामासाठी तीन वर्ष म्हणजे तीन सुकी वर्ष बांधकामाला लागतात. म्हणजे असे की नदीचा पाट अगदी सुकला की मग काम सुरू करायचे असते. परंतु शीरगावचे धरण अद्भुत गतीने पुरे झाले.

२० मे १९७४ या दिवशी वारणा खोऱ्यात गेल्या कित्येक वर्षांत पडला नव्हता असा तुफान पाऊस पडला. त्यामध्ये वारणीचा ह्या किनाऱ्यापासून त्या किनार्‍यापर्यंत पाणी तुडुंब भरू लागले. त्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण प्रदेश पाण्याखाली गेला. सप्टेंबर अखेरीस पाण्याचा उतार सुरू झाला. शिगावच्या धरणाचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. आणि त्यावर्षीच पाणीसाठा करणं शक्य झालं. आणि या धरणाचे रीतसर उद्घाटनही झाले. शेती समस्या सोडविण्यासाठी संस्थांनी व शेतकरी गटांनी शासनावर नेहमी अवलंबून न राहता स्वतः एकत्र येऊन, विविध प्रकारच्या योजना शोधून काढल्या पाहिजेत व स्वतः त्या कार्यान्वित केल्या पाहिजेत. शासनाच्या स्वाभाविक मर्यादा ओळखून स्वतः काही कामे उरकून टाकावी. राष्ट्रसेवा व समाजसेवा या कामातून आपोआप साधते. आणीबाणी पाणी आणते, आणू शकते, आणायला लावते हे मात्र वारणा खोरे यावर आलेल्या आणीबाणी मुळे समजले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *