|

वाशीम जिल्ह्यात होस्टेल मधील १९० विद्यार्थ्यांना कोरोना

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वाशीम: कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील ५ राज्यात कोरोना रुग्णात मोठी वाढ होत आहे. राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी वाशीम जिल्ह्यात कोरोनाचे ३१९ रुग्ण आढळून आले आहेत. यात एकाच होस्टेल मध्ये राहणाऱ्या १९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव येथील होस्टेल मध्ये राहणाऱ्या १९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना नियंत्रणात यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र एकाच ठिकाण एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने ही प्रशासनाची चिंता वाढविणारी बाब आहे.

वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी होस्टेलची पाहणी केली आहे. देगाव मध्ये असणाऱ्या निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. हे सर्व विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून शिक्षणासाठी येथे आले आहे. होस्टेल विद्यार्थ्यांसोबत ४ शिक्षकांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.    


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *