भाजपचे सरकार असतांना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार नसावा, अस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी कॉन्ग्रेचे आमदार रोहीत पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सीताराम कुंटे यांनी तयार केला नसावा, त्यांनी केवळ त्या अहवालावर सही करायला लावली अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहीत पवार यांनी उत्तर दिले आहे
राज्याच्या मुख्य सचिवानी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याच काही’अनुभवी’ नेत्याच म्हणण आहे. म्हणून भाजपा सरकार असतांना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का, असा प्रश्न मला पडला आहे. पण हे सरकार व मुख्य सचिव अस करणार नाही याची मला खात्री आहे.
मुख्यसचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेट. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच फोन टॅपिंगच षडयंत्र रचण्यात आल काय, अशी शंका या अहवालावरून येत आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणही अवघड होईल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.
याच बरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.