|

प. बंगाल निवडणूक : कोरोनाग्रस्त काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू

W. Bengal elections: Coronated Congress candidate dies in hospital
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान कोरोनाचा कहर सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोविड-१९ महासाथीमध्ये कोविड पॉझिटिव्ह झालेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आज सकाळी कोलकत्त्यातील एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते मुर्शिदाबादमधील शमशेर गंज विधानसभा भागातून उमेदवार होते.
कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर ते कोलकत्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाची सुरू आहे. त्यात गेल्या २४ तासात ६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, कोरोनामुळे शमशेर गंजमधून काँग्रेसचे उमेदवार रेजाउल हक यांचा मृत्यू झाला. आता ही वेळ अधिक सजग राहण्याची आहे. आपण जिवंत राहू आणि पुढील वर्षाचं कॅलेंडर पाहण्यासाठी महासाथीमधून स्वत:चा बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.


पश्चिम बंगालमधील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकूण ४२,२१४ नमुन्यांची तपासणी केली त्यापैकी ४,८१७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. याचवेळी २,२७८ बाधितांनी कोरोनावर मात केली. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ५,८४,७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *