वाळू तस्करीवरून विखेंनी केली महसूलमंत्र्यांवर टीका
अहमदनगर: जिल्ह्याचे राजकारण राज्यात चर्चिले जाते. त्यामुळे इथे कोणता नेता कोणाला काय म्हटलं हे ऐकण्यासाठी सगळ्या महाराष्ट्राचे कान आतुरलेले असतात. भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. जिल्ह्यात वाळूची सर्रास चोरी होत असून त्यातून गावाने पोसण्याचे काम चालू आहे. या घडणाऱ्या प्रकाराबाबत महसूलमंत्री गप्प का असा प्रश्न विखे-पाटील यांनी विचरला आहे.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्य ऑनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते.निळवंडे धरणाचे पाणी जर गणेश कारखान्याच्या क्षेत्रात आले तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल असे विखे-पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यात दिवसाढवळ्या वाळूउपसा चालू आहे. हा वाळू उपसा करणाऱ्यांना पोसणारे पण सत्ताधारीच असल्याचा घणाघाती आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.
कोपरगाव आणि संगमनेर या ठिकाणी हेच उद्योग दिवसाढवळ्या चालू आहेत. माफिया लोकांनी गाव पुढारी आणि माफिया पोसायचे पद्धत चालू केली असल्याची टीका आमदार विखे पाटील यांनी केली आहे.यावेळी निळवंडेच्या कार्यक्रमाला गती दिल्यामुळे पिचड आणि विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पण यावेळी सभेत मंजूर करून घेण्यात आला.