Monday, September 26, 2022
Homeराजकीयविधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले

२  मे रोजी निकाल लागणार

दिल्ली: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत  तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. पाचही राज्याच्या निवडणूकीचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत.  

तामिळनाडू,पुद्दुचेरी आणि केरळ मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.आसाम राज्यात ३ टप्यात मतदान होणार आहे. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चीम बंगाल मध्ये ८ टप्प्यात निवडणूक होणार आहे.  

मतदानाची वेळ १ तासाने वाढविण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज online भरता येणार आहे. निवडणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे. ८० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध असणार आहे.

१) आसाम राज्यातील १२६ मतदारसंघसाठी तीन टप्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा टप्पा १ एप्रिल, तिसरा टप्पा ६ एप्रिल

२ ) केरळ राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एका टप्प्यातच मतदान होणार आहे.

३)  तामिळनाडू मध्ये १ टप्प्यात ६ एप्रिल रोज मतदान होणार आहे.

४ ) पश्चिम बंगाल  मध्ये ८ टप्प्यात मतदान होणार आहे.

१ टप्पा २७ मार्च, २ टप्पा १ एप्रिल, 3  टप्पा ६ एप्रिल, ४  टप्पा १० एप्रिल, ५ टप्पा १७ एप्रिल, ६ टप्पा २२ एप्रिल, ७ टप्पा २६ एप्रिल, ८ टप्पा २९ एप्रिल .

५) पुद्दुचेरी मध्ये १ टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments