Saturday, October 1, 2022
HomeZP ते मंत्रालयभावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्...

भावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्…

प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा मुलगा वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच धनुष आज 28 जुलै रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे.
धनुषच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधीत खास गोष्टी…

धनुष तमिळ चित्रपटासाठी ओळखला जातो

निर्माता कस्तूरी राजाच्या घरी जन्मलेल्या धनुषला भावाच्या दबावाखाली येऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागला. धनुष अभिनेता , पार्श्वगायक, गीतकार आणि निर्माता असून मुख्यतः तमिळ चित्रपटासाठी ओळखला जातो.

‘रांझणा’ चित्रपटातून हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण

धनुषने 2013 साली ‘रांझणा’ चित्रपटातून हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. यादरम्यान, धनुशने ‘एक्सप्रेस खिलाडी’, ‘मारी’, ‘कुसेलन’, ‘तिरुदा तिरुदा’, ‘सुल्लन’, ‘परत्तई एंगिरा अजहगु सुन्दरम‘,’आढू ओरु काना कालम’,’आदुकलम’ यासारखे दमदार चित्रपट सिनेमासृष्टीला दिली.

चित्रपटाच्या रिलीज दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट

‘कधल कोंडे’ याचित्रपटाच्या रिलीज दरम्यान धनुष आपल्या कुटुंबासह सिनेमा हॉलमध्ये गेला होता. तिथे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या उपस्थित होती. सिनेमाच्या मालकाने सर्वप्रथम राजनिकांतची मुलगी ऐश्वर्याशी धनुषची ओळख करून दिली आणि त्यानंतर ऐश्वर्याने धनुषच्या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

पण दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषला फुलांच्या गुच्छासह एक खास चिठ्ठी लिहून पाठवली. धनुषला ऐश्वर्याचा हा गोड स्वभाव खूप आवडला. पण त्यावेळी यादोघांमध्ये प्रेमासारखे काहीच नव्हतं.

लग्नाआधी धनुष आणि ऐश्वर्याने केले एकमेकांना डेट

अन काही वेळातच ऐश्वर्या आणि धनुषच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या. अशा परिस्थितीत, दोघेही एकमेकांसाठी चांगले जीवनसाथी ठरू शकतात, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले.यानंतर, दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना भेटायला लावले धनुष ऐश्वर्याच्या गोड स्वभावामुळे आधीच प्रभावित झाला होता आणि ऐश्वर्याची मैच्योरिटी बघून तो तिच्या प्रेमात पडला.

धनुष आणि ऐश्वर्या 2004 साली विवाह बंधनात अडकले

हळूहळू दोघांनाही ते एकमेकांसाठी परिपूर्ण आहे असे वाटू लागले आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले होते. यानंतर 2004 साली धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत विवाह बंधनात अडकले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धनुष आणि ऐश्वर्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही लोकांना वाटले की, ते दोघे एकमेकांसाठी मिसमैच  आहे. कारण, ऐश्वर्या धनुषपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. पण वयामुळे दोघांमध्ये कधीच दुरावा आला नाही.

JFW ला दिलेल्या मुलाखतीत

JFW ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रजनीकांतने धनुषसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते – आमच्या नात्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आम्ही दोघे एकमेकांना खूप स्पेस देतो. एकत्र राहण्यासाठी आम्ही कधीही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही.

18 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट

यात काहिच शंका नाही की, दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. सोशल मीडियावरही हे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यापासून कधीच मागे हटले नाहीत. दोघेही दोन मुलांचे पालक आहे. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर दोघांची सुंदर प्रेमकहाणी संपुष्टात आली आणि या दोघांनी एकमेकांच्या सहमतीन घटस्फोट घेतला.

अधिक वाचा :

नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments