‘उद्या’ ला साहित्य अकादमी
दिल्ली: साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच गोविंद महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुसंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीसाठी सतिश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. जेष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचे विपुल लेखन केले आहे.
आय आय टी मुंबई मधून त्यानी पदवी घेतली आहे. ते सिव्हील इंजिनियर आहेत. इंडिका, कहाणी मानव प्राण्याची, कापूस कोंड्याची गोष्ट, बखर अनंत काळाची आदी पुस्तके नंदा खरे यांनी लिहिली व अनुवादित केली आहेत. ते मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य होते.
साहित्य अकादमी आज २० भाषणासाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यात सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटक, एक-एक संस्मरण आणि महाकाव्याचा समावेश आहे.